पुण्यातील ओशो आश्रमात राडा! आंदोलक अनुयायांवर पोलिसांचा लाठीचार्ज : Osho Ashram Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osho International Centre

Osho Ashram Pune: पुण्यातील ओशो आश्रमात राडा! आंदोलक अनुयायांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुण्यातील ओशो आश्रमात राडा झाल्याचं वृत्त आहे. ओशोंच्या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाल्यानं या अनुयायांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामुळं आंदोलन करणारे हे अनुयायी आक्रमक झाल्याचे पहायला मिळालं. आश्रमाच्या मालकीवरुन त्यांचे अनुयायी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. (Osho International Center in Pune Lathi charge on protesting followers of Osho)

गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं ओशो आश्रम प्रशासन आणि ओशोच्या अनुयायांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. पण अनुयायांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळं बराच वेळ ओशो आश्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं पुण्यातील ओशो आश्रमाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ओशोंचे अनुयायी आश्रमाजवळ गोळा झाल्यानं परिस्थिती चिघळली, तसेच त्यांनी सुरक्षारक्षकांना डावलून आश्रमात प्रवेश केल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनी अनेक अनुयायांना ताब्यात घेतलं.

आचार्य रजनीश ओशो यांचा काल ७०वा संबोधी दिवस साजरा झाला. या निमित्तानं जगभरातून अडीच ते तीन हजार ओशोंचे अनुयायी कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झाले. मोठ्या प्रमाणावर अनुयायी एकत्रित आल्याने त्यांनी ओशो आश्रमात सुरक्षारकांना डावलून प्रवेश मिळवला, त्यामुळं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

हे ही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

आंदोलन कशासाठी सुरु?

ओशो आश्रमात होत असलेल्या भ्रष्टाराच्याविरोधात ओशोंच्या अनुयायांकडून आंदोलन सुरु आहे. तसेच या अनुयायांना आश्रमात जाऊ दिलं जात नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून आश्रमाबाहेर त्यांचं आंदोलन सुरु आहे. यापार्श्वभूमीवर काल त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते.

टॅग्स :Pune Newsosho