Pune Crime : ओतुर येथे गांजा वाहतुकीवर कारवाई; तब्बल ६ लाख ६० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त

ओतूर पोलीसांनी गांजाची वाहतुक करणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडले, एकूण सहा लाख साठ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त
Otur police action ganja transport 6 lakh 60 thousand rupees ganja seized pune crime
Otur police action ganja transport 6 lakh 60 thousand rupees ganja seized pune crimesakal

ओतूर : येथील पोलीसांनी गांजाची वाहतुक करणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडले असून बाजारभावा नुसार जप्त केलेला गांजा व गाडी यांची अंदाजे किंमत सहा लाख साठ हजार आठशे रूपयाचा असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांनी दिली.

सिध्दार्थ किशोर टेकाडे वय. ३१ रा. संगमनेर, वाडेकर गल्ली संतोष दत्तात्रय जऱ्हाड वय.३७ रा.थोरात किडा संकुल जवळ माळीवाडा दोघेही ता. संगमनेर जि. अहमदनगर हे असून १२ किलो ४०० ग्रॅम वजनाचा तपकीरी रंगाचा, उग्र वास येत असलेला गांजा व बोलेरो गाडी नं. एम.एच. १७ बी.एस. ०३३६ ही जप्त करण्यात आली आहे.

Otur police action ganja transport 6 lakh 60 thousand rupees ganja seized pune crime
Mumbai police Crime : मुंबई पोलिसांच्या पथकावर संभाजी नगरमध्ये हल्ला, पोलिसांकडून चौघांना अटक

याबाबत ओतूर पोलिसात कडून मिळालेल्या माहितीनुसार बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर बाजुकडुन कल्याण बाजुकडे पांढरे रंगाची बोलेरो गाडी नं. एम. एच. १७ बी. एस.०३३६ यामधुन गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक होणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार ओतूर गावचे हद्दीत अहमदनगर कल्याण हायवेवर मांडवी नदिचे पुलाजवळ कातकरी वस्तीच्या बाजुला सापळा गुरूवारी

रात्री सिध्दार्थ टेकाडे व संतोष जऱ्हाड यांना हे त्यांच्याकडील पांढरे रंगाची बोलेरो गाडी नं. एम.एच. १७ बी.एस. ०३३६ यामुधन अहमदनगर बाजुकडुन कल्याण बाजुकडे जात असताना मिळुन आली. त्यानंतर सदरच्या वाहनाची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये १२ किलो ४०० ग्रॅम वजनाचा तपकीरी रंगाचा, उग्र वास येत असलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला आहे.

Otur police action ganja transport 6 lakh 60 thousand rupees ganja seized pune crime
Pune : केंद्रीय योजना लोकांपर्यंत पोचवा; केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांची सूचना

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे,पोलीस हवालदार महेश पटारे,नरेंद्र गोराणे,पोलीस नाईक धनंजय पालवे, देविदास खेडकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com