Kasba Bypoll Election : सोने, चांदी, पैसे सर्वकाही स्वीकारले जाईल, पण... ; कसब्यात झळकल्या पुणेरी पाट्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election

Kasba Bypoll Election : सोने, चांदी, पैसे सर्वकाही स्वीकारले जाईल, पण... ; कसब्यात झळकल्या पुणेरी पाट्या!

पुण्यात कसबा-चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. येत्या २६ फेब्रुवारीला दोन्ही मतदार संघात निवडणूक होणार आहे. यापूर्वी राजकीय पक्षांनी प्रचारासाठी आपली कंबर कसली आहे. शरद पवारांपासून ते आदित्य ठाकरे पर्यंत सर्व नेत्यांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. चिंचवड आणि कसबा दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. 

दरम्यान पुण्यात निवडणूक असल्यामुळे पुणेरी पाट्या, पुणेरी टोमण्यांनाचा उल्लेख होणार नाही तर नवलच, कसब्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणेरी पाट्या झळकल्या आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सगळे पक्ष सज्ज असताना पुणेरी पाट्यांची एन्ट्री झाली आहे.

"कोणी कितीही म्हटलं, तुमचं काम मार्गी लागतो पण सर्वांना माहितीये वेळेला फक्त रवीभाऊच धावतो! त्यामुळे आम्हाला कुठलेही आमिष दाखवू नयेत"
#यंदाकसब्यातधंगेकरच , असा उल्लेख पाट्यांवर दिसत आहे. 

"येथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप - मत मात्र रवी धंगेकरांनाच दिले जाईल!" #यंदाकसब्यातधंगेकरच, असे मजकुराच्या पाट्या आता कसबा मतदारसंघात दिसून आले आहे

टॅग्स :Pune Newspune