ओतूरमध्ये नाकेबंदीत दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम जप्त

पराग जगताप
बुधवार, 3 एप्रिल 2019

ओतूर ता.जुन्नर - ओतूर येथे नाकाबंदी दरम्यान दोन लाखा पेक्षा जास्त रक्कम व कार जप्त.देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहु लागले असून अचारसंहिता लागू झाली आहे.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श अचासंहितेचे पालन व्हावे म्हणून तसेच निवडणूक काळात पैश्याचा वापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोगा कडुन व महाराष्ट्र पोलीस दला कडुन विशेष काळजी घेतली जाते. त्यानुसारच जुन्नर तालुक्यात चारही पोलीस ठाण्याकडून प्रमुख मार्गावर नाकाबंदी करुन गाड्याची तपासणी केली जाते.

ओतूर ता.जुन्नर - ओतूर येथे नाकाबंदी दरम्यान दोन लाखा पेक्षा जास्त रक्कम व कार जप्त.देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहु लागले असून अचारसंहिता लागू झाली आहे.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श अचासंहितेचे पालन व्हावे म्हणून तसेच निवडणूक काळात पैश्याचा वापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोगा कडुन व महाराष्ट्र पोलीस दला कडुन विशेष काळजी घेतली जाते. त्यानुसारच जुन्नर तालुक्यात चारही पोलीस ठाण्याकडून प्रमुख मार्गावर नाकाबंदी करुन गाड्याची तपासणी केली जाते. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्या अंतर्गत येणार्या गावां मध्ये सहायक निवडणूक अधिकार्याच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी दोन भरारी पथके नेमलेली आहेत.

ओतूर ता.जुन्नर येथे लोकसभा निवडणूक अचारसंहीतेच्या पर्शभूमीवर पोलीसानी नाकाबंदी दरम्यान दोन लाख पेक्षा जास्त रुपयाची रोख रक्कम व कार जप्त केल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी दिली.

लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संदिप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक संदिप जाधव, जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिसांकडुन नगर कल्याण महामार्गावर विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. नाकाबंदी दरम्यान पोलिसांना ओतूर बसस्थानका समोर नगर कल्याण महामार्गावर स्वीफ्ट कार क्र.एम.एच १४ डि.एन.५६४० या गाडीची तपासणी करत असताना गाडीच्या समोरील डाव्या बाजुच्या कप्यात रोख रक्कम २ लाख पेक्षा जास्त असल्याचे समजले आले. सदर रक्कमेबाबात गाडी चालकाला विचारणा केली असता त्याने रक्कम कोठून आणली कुठे चालवली, कुणीची रक्कम आहे. याबाबत पोलिसांना समाधान कारक उत्तर न दिल्याने, सदर वाहन व रोख रक्कम अंदाजे रुपये २ लाख पेक्षा जप्त ओतूर पोलीसानी जप्त केली. तसेच पुढील कारवाई भरारी पथक प्रमुख डी.एन.राठोड यांच्याकडे सुपुर्द केल्याची माहिती खुणे यांनी दिली.

Web Title: Over two lakhs of rupees were seized in Otur