सेरेब्रल पाल्सीवर मात करत तो झाला वाणिज्य पदवीधर

pune
pune

पुणे : ''आता सगळेच मार्ग खुंटले, यापुढे काही करता येणार नाही'', असे म्हणत जी माणसे परिस्थितीला शरण जातात त्यांची प्रगती खुंटते. पण काही माणसे परिस्थितीला शरण न जाता पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते यशोशिखरावर नक्कीच पोहचतात. याची प्रचिती हिमांशु पाटसकरला भेटल्यावर येते. सेरेब्रल पाल्सी असतानाही वाणिज्य शाखेचा पदवीधर झालेल्या हिमांशुला जर्मन भाषा शिकायची आहे. एमकॉम करुन शेअर ट्रेडींग सारख्या व्यवसायात करियर करायची इच्छा आहे. क्रिकेटची खुप आवड असलेला हिमांशु विराट कोहली आणि सलमान खानचा चाहता आहे;


घरच्यांचा, मित्रांचा, शिक्षकांचा आणि समाजातील अनेकांचा पाठींबा आणि प्रोत्साहन यामुळे मी येथवर पोहचू शकलो नाहीतर, अपंग किंवा अडगळीतला जीव अशा स्थितीत जीवन काटणा-यां मध्येच आपली गणना झाली असती याची जाणीव हिमांशुला आहे. त्यामुळेच तो इतरांना सुध्दा सांगतो, प्रयत्न करत रहा. नक्की यश मिळेल. सेरेब्रल पाल्सी ही मेंदूची स्थिती आहे, रोग नव्हे. मुलाच्या अंगभूत क्षमता, पालकांचा नियमित उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळाल्यास या मुलांचा इतरांसारखाच विकास होऊन ती स्वावलंबी बनू शकतात.
 
''त्याचा जन्म झाल्यापासून तो पुर्ण शून्यात असल्यासारखा होता. सतत रडायचा. त्यामुळे आम्ही खुप चिंताग्रस्त झालो होतो. तज्ञांकडून निदान झाल्यावर आम्ही निराश झालो होतो. सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केले तर सेरेब्रल पाल्सीवर मात करता येते याचा अनुभव आम्ही घेत आहोत. त्यामुळे तुमच्याकडे असे कोणी असेल तर निराश होवू नका. त्याला पुढे जाण्यासाठी पाठिंबा द्या.''
- जगदीश पाटसकर (बाबा)

माणसात नसल्यासारखी हिमांशुची स्थिती होती. ड़ॉ. शशांक श्रोत्री यांनी दिलेला मानसिक आधार आणि मार्गदर्शन, फिजीओथेरपी, मसाज, स्पीच थेरपी आणि विविध उपचार पध्दतीचा वापर करुन हिमांशुमध्ये परिस्थितीशी सामना करण्याचे बळ आले. तिस-या मजल्यावरुन उचलून खाली आणने आणि शाळेत पोहचवणे, परत आणने, त्याच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व करण्याचे काम त्याच्या बाबांनी केले. अभ्यास घेण्याची जबाबदारी मी पाहिली. मैत्रिण अर्चना कडू, भाऊ ऋषीकेश यामुळे हिमांशुला कधीच एकटेपणा जाणवला नाही.
- संगीता पाटसकर (आई) 

हिमांशुला शिकवणे म्हणजे माझ्यासाठी एक आव्हान होत. पण हे आव्हान मी त्याच्याच मदतीने कसे पार केले हे कळलेसुध्दा नाही. अतिशय नियमित आणि मला सगळय्ाच गोष्टी आल्याच पाहिजेत ही जिद्द त्याच्यात मला खुप प्रकर्षानी जाणवली आणि माझे काम अगदीच सोपे झाले. इतरांपेक्षा आपण कुठेही मागे पडणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेत असतो. 
- अर्चना मायदेव (शिक्षण तज्ञ) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com