पुणे : ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; रेल्वेगाड्या दोन तास खोळंबल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

- पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर ठाकरवाडी ते जामरुंगदरम्यान दरडीचा काही भाग पडल्याने ओव्हरहेड वायरवरचा बिघाड निर्माण झाला.

पुणे : पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर ठाकरवाडी ते जामरुंगदरम्यान दरडीचा काही भाग पडल्याने ओव्हरहेड वायरवरचा बिघाड निर्माण झाला. त्यामुळे आज सायंकाळी सहा वाजल्यापासून पुण्याकडे येणाऱ्या प्रगती, डेक्कन क्वीनसह लांब पल्ल्याच्या गाड्या कर्जतपासून एका मागोमाग एक खोळंबल्या होत्या. या बिघाडामुळे दोन तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिघाड दुरुस्त झाल्यानंतर गाड्या पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सायंकाळच्या वेळेलाच ही घटना घडल्याने पुण्याकडे येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाली. पावसाळा संपल्यानंतर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत होण्याची एकही घटना घडली नव्हती. मात्र, मंगळवारी ठाकुरवाडी ते जामरूंगदरम्यान दरडीचा मोठा दगड मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायरवर कोसळला. मुंबईहून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे रवाना झालेली कन्याकुमारी एक्‍स्प्रेस येण्याच्या काही वेळ आधी ही घटना घडली. त्यामुळे ही गाडी कर्जतजवळ अडकून पडली. त्यामागून येणारी प्रगती एक्‍स्प्रेस कर्जत स्थानकात थांबविण्यात आली. त्यानंतर डेक्कन क्वीन, सह्याद्री एक्‍स्प्रेस, इंद्रायणी एक्‍स्प्रेस या गाड्याही अडकून पडल्या.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...

ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याचे समजताच रेल्वेकडून वायर दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती
घेण्यात आले. मात्र, बिघाड मोठा असल्याने त्यासाठी दोन तासांचा कालावधी लागला, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overhead line not worked well trains delayed