esakal | अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना
sakal

बोलून बातमी शोधा

scholarship scheme

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी.) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेंतर्गत २०२१-२२ शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ जून २०२१ पर्यंत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

हेही वाचा: पुणे महापालिका, ZPची म्युकरमायकोसिस रुग्णांची शोधमोहिम

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रॅंकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने नमुन्यातील अर्ज www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करून घ्यावा. हा अर्ज swfs.applications.2122@gmail.com या इ-मेलवर पाठवून त्याची प्रत मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्त्यावर द्यावी.

हेही वाचा: पुणे महापालिका, ZPची म्युकरमायकोसिस रुग्णांची शोधमोहिम

या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे आणि पीएच.डी. साठी ४० वर्षे कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एम.डी. आणि एम.एस.अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. तसेच, वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त नसावे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण