अहोऽऽ ती करतेय घुबडांचा अभ्यास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे - आकर्षक ग्रीटिंग्स्‌ गोळा करणे, चित्र काढणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे, असे अनेक छंद लहान मुले जोपासतात. मात्र एखाद्या पक्ष्याबद्दल प्रचंड आकर्षण वाटणे, त्या पक्ष्याची वस्तीस्थाने शोधून त्याचे निरीक्षण करणे, त्याला आवडते खाद्य, जीवनमान याबद्दलची माहिती प्रत्यक्ष निरीक्षणातून संकलित करणे, असा छंद कोणी जोपासला तर! आश्‍चर्य वाटतंय ना! पण इयत्ता नववीत शिकणाऱ्या श्रेया कुलकर्णी हिने ‘घुबडा’चा अभ्यास करण्याचा छंद जोपासला आहे. 

‘एसपीएम’ इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारी श्रेया सध्या ‘पिंगळा’ या प्रकारच्या घुबडाबद्दल अधिकाधिक जाणून घेत असून, तिला पक्षीनिरीक्षणाचा छंद आहे. पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे आणि धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ती ‘पिंगळा’ या पक्षाविषयी अभ्यास करीत आहे. पुण्यात पिंगळा आणि गव्हाणी घुबड अशा दोन प्रकारची घुबड मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यातील ‘पिंगळा’ हा पक्षी तिने अभ्यासासाठी निवडला आहे. ‘होमी भाभा यंग सायंटिस्ट’ या परीक्षेसाठी श्रेयाने हा अभ्यास सुरू केला आहे. परंतु ही परीक्षा झाली तरीही तिचा अभ्यास सुरूच आहे. शहरातील पिंगळ्याच्या दोन रहिवासांच्या परिसरातून तिने १५७ पॅलेट्‌स गोळा करून काही निष्कर्ष काढले आहेत. यात हा पक्षी मुख्यत: किडे, उंदीर कुळातील प्राणी आणि छोटे सरपटणारे प्राणी यावर उपजीविका करतो, हे निदर्शनास आले आहे. हे पक्षी मुख्यत: लोकवस्तीजवळ राहत असल्याने ते माणसांसाठी घातक आणि त्रासदायक असणाऱ्या कीटक आणि उंदीर कुळातील प्राण्यांपासून माणसांचे संरक्षण करतात.

या संशोधनाचा भाग म्हणून श्रेयाने घुबडाबद्दल असलेले समाजमानस जाणून घेण्यासाठी काही लोकांचे विचार संकलित केले. तिच्या या संग्रहित माहितीनुसार, आजही अनेकजण घुबडाला अशुभ मानतात. त्याला मृत्यूचा अशुभ संदेशवाहक म्हटले जाते. या पक्षाला काळी जादू, चेटूक या कारणांसाठी ठार मानले जाते. अंधश्रद्धेमुळे या पक्ष्यांना परिसरातून हुसकावून लावले जाते. त्यामुळे या पक्ष्यांची संख्या कमी होत आहे, असे निरीक्षण श्रेया हिने नोंदविले.

Web Title: owl study