युती नको, स्वबळावर लढू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - "भाजपला "ग'ची बाधा झाली आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याशिवाय पर्याय नाही', अशा शब्दांत पुणे, पिंपरी-चिंचवड येथील शिवसेना नेत्यांनी पक्षप्रमुखांपुढे आपली बाजू मांडली. युती नको, स्वबळावरच ताकदीने निवडणूक लढविण्याची आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. याबाबत गुरुवारी पक्षाची भूमिका स्पष्ट करू, असे उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांना सांगितले.

महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात भाजप-शिवसेनेच्या गेल्या आठवड्यात बैठका झाल्या. मात्र मुंबई महापालिकेतील युती होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या दोन दिवसांत मुंबईत झालेल्या घडामोडींवरून युती होत नसल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, पुण्यातील नेत्यांची बुधवारी "मातोश्री'वर बैठक आयोजित केली होती. माजी मंत्री शशिकांत सुतार, शहरप्रमुख विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत दोन्ही महापालिकांच्या तयारीचा आढावा ठाकरे यांनी घेतला. त्या वेळी युतीबाबत प्रत्येकाचे मत जाणून घेण्यात आले. बहुसंख्य नेत्यांनी या वेळी "युती नको' अशीच भूमिका मांडली. स्बळाची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर ठाकरे म्हणाले, ""युतीसंदर्भात पक्षाची भूमिका काय आहे, हे उद्या होणाऱ्या मेळाव्यात जाहीर केले जाईल.''

Web Title: own fight