esakal | आता लायब्ररीतून घ्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen concentrator

पुणे महापालिकेेने तयार केली ऑक्सिजनची लायब्ररी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेला ‘सीएसआर’मधून मिळालेल्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचा वापर गरजू कोरोना रुग्णांसाठी व्हावा, यासाठी आरोग्य विभागाने ऑक्सिजनची लायब्ररी तयार केली आहे. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना या लायब्ररीतून ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.(Oxygen Library set up by Pune Municipal Corporation)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेला विविध संस्था, कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर दिले आहेत. याचा वापर कोरोनाच्या रुग्णांसाठी होऊ शकतो. त्यातून आयुक्तांनी ही कल्पना समोर आणली आहे.

हेही वाचा: पाठ्यपुस्तकाविनाच यंदा होणार मुलांची शाळा सुरू

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना ७ दिवस, १५ दिवस किंवा एका महिन्याच्या कालावधीसाठी ५ ते १० लिटरचे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर लायब्ररीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.गरजू रुग्णांनी यासाठी महापालिकेच्या गाडीतळ येथील सेंट्रल मेडीकल स्टोअरमध्ये आरोग्य विभागाचे समन्वय राहुल वडगाये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे

हेही वाचा: भीमामाईचा उलगडणार प्रवास! अभ्यासासाठी विशेष समिती

अशी आहे नियमावली

- रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर हवा असेल तर नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक

- रुग्णाचा कोविड पॉझिटिव्ह अहवाल आवश्यक

- संशयित रुग्ण असेल तर किंवा डिस्चार्ज दिलेला रुग्ण असेल तर किती दिवसांसाठी ऑक्सिजनची गरज आहे, यासाठीचे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्‍यक

- रुग्णाचे हमीपत्र आणि त्यासोबत नाव, पत्ता, आणि आधारकार्ड हा पुरावा द्यावा लागणार