esakal | पुणे : भारत विकास परिषदेच्यावतीने ‘सेठ ताराचंद’ला ऑक्सिजन प्रकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Plant

पुणे : भारत विकास परिषदेच्यावतीने ‘सेठ ताराचंद’ला ऑक्सिजन प्रकल्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखेच्यावतीने सेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालयासाठी पूर्ण क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प भेट दिला जाणार आहे. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा येत्या १७ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा प्रकल्प या रुग्णालयाकडे सुपूर्द केला जाणार आहे.

हेही वाचा: भोसरी एमआयडीसीमध्ये क्लोरीन गळती

भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ता चितळे यांनी आज (ता. ८) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी या परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य राजेंद्र जोग, विश्‍वस्त व अभिनेते राहुल सोलापूरकर आणि शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष मंदार जोग आदी उपस्थित होते.

चितळे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने हा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. कोरोना निर्बंधामुळे हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी खुला ठेवला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे झालेले हाल लक्षात घेत, भविष्यात गरजू रुग्णांना ऑक्सिजनची टंचाई भासू नये, या उद्देशाने हा प्रकल्प उभारला आहे. याच्या उभारणीस सुमारे ४० लाख रुपये खर्च केले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकावेळी सुमारे शंभर रुग्णांना आॅक्सीजन पुरवठा करता येऊ शकणार आहे.’’

हेही वाचा: Pune : ‘मराठीच्या भल्यासाठी’ संस्थेची पुनर्रचना

कोरोना काळात परिषदेने राबविलेले उपक्रम

  • गेल्या दीड वर्षात तीन रक्तदान शिबिरे

  • रक्तदान शिबिरांत सुमारे एक हजार व्यक्तींचे रक्तदान

  • शहरातील २ हजार डॉक्टरांना साठी फेसशिल्ड वाटप

  • पुण्यात १० हजारांहून अधिक सॅनिटायझर बाटल्यांचे मोफत वाटप

  • गरजू २ हजार कुटुंबांना किराणा माल किट वाटप

  • रुग्णांच्या समुपदेशनासाठी आरोग्यमित्र उपक्रम अंमलबजावणी

loading image
go to top