...अखेर पहाडदरा शाळेची ठेकेदाराने केली पुन्हा दुरूस्ती

सुदाम बिडकर
Friday, 18 September 2020

पहाडदरा (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करताना संबंधित ठेकेदाराने पुढील व्हरांड्याचे जुने लाकडी खांब तसेच ठेऊन त्यावर पत्रे बसवले होते. एक महिन्यातच पुढील बाजूचे छत कोलमडून पडले. याबाबत दैनिक सकाळ मध्ये बातमी प्रसिध्द होताच संबंधित ठेकेदाराने जुने लाकडी खांब काढून नविन लोखंडी अॅगल बसवून पुन्हा पत्रे बसवले आहेत.

पारगाव (पुणे) : पहाडदरा (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करताना संबंधित ठेकेदाराने पुढील व्हरांड्याचे जुने लाकडी खांब तसेच ठेऊन त्यावर पत्रे बसवले होते. एक महिन्यातच पुढील बाजूचे छत कोलमडून पडले. याबाबत दैनिक सकाळ मध्ये बातमी प्रसिध्द होताच संबंधित ठेकेदाराने जुने लाकडी खांब काढून नविन लोखंडी अॅगल बसवून पुन्हा पत्रे बसवले आहेत.

अजित पवार पुन्हा कडाडले, 'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

येथील प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीला एक महिन्यापूर्वीच जिल्हा परिषदेने नव्याने पत्र्याचे छत बसवले. संबंधित ठेकेदाराने शाळेच्या पुढील व्हरांड्याचे जुने लाकडी खांब तसेच ठेऊन त्यावर पत्रे बसवले होते. या परिसरात झालेल्या वादळी पावसाने शाळेचे पुढील बाजुचे छत कोलमडून पडले होते. ठेकेदाराने नविन पत्रे टाकताना जुने खांब बदलून नविन लोखंडी खांब बसवणे गरजेचे होते. परंतु, जुनेच खांब वापरल्याने अवघ्या दिड महिन्यातच छत कोसळले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषदेने संबंधित ठेकेदाराकडून हे छत त्वरीत दुरुस्त करुन घ्यावे अशी मागणी सरपंच राजश्री संतोष कुरकुटे यांनी केली होती. यासंबंधी दैनिक सकाळमध्ये बातमी प्रसिध्द होताच संबधित ठेकेदाराने जुने लाकडी खांब काढून नविन लोखंडी अॅगल बसवून पुन्हा पत्रे बसवले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pahaddara school contractor repaired