वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती पवार यांचे संशोधन लंडनमध्ये सादर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

बारामती शहर : न भरुन येणाऱ्या जखमांवर केलेले संशोधन बारामतीच्या वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती सतीश पवार यांनी नुकतेच लंडन येथे आयोजित परिषदेत सादर केले. 

बारामती शहर : न भरुन येणाऱ्या जखमांवर केलेले संशोधन बारामतीच्या वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती सतीश पवार यांनी नुकतेच लंडन येथे आयोजित परिषदेत सादर केले. 

लंडन येथे 9 ते 11 मे दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. किर्ती पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. मणक्यांचे आजार, नसांचे दुखणे, मधुमेह, रक्तवाहिन्यांमधील गुठळ्या, बेडसोअर्स, व्हेरीकोज अल्सर अशा अनेक प्रकारच्या व्याधींच्या रुग्णांसाठी त्यांनी केलेले संशोधन वरदानच ठरणार आहे. अशा प्रकारच्या आजारांसाठी औषधांसह स्टेमसेल थेरपी किंवा शस्त्रक्रिया यांचा वापर करावा लागत होता. 

डॉ. कीर्ती पवार यांन स्नायूंवरील केलेल्या संशोधनामुळे कोणतेही दुष्परिणाम न होता सोप्या पध्दतीने दुर्धर आजार बरे होण्यास मदत होणार आहे. 
लंडनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाची चर्चा झाली. 

अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टरांनी त्यांना विविध देशात या संशोधनाची सविस्तर माहिती देण्यासाठी आमंत्रितही केले आहे. कमी खर्चा तो होणारी ही पध्दती सर्वांना अधिक प्रभावी वाटली. 

सर्जन, प्लॅस्टिक सर्जन, त्वचारोगतज्ज्ञ, जनरल प्रॅक्टीशनर्स यांना या संशोधनाचा अधिक उपयोग होईल. डॉ. सतीश पवार व सम्राज्ञी पवार यांनीही या संशोधनादरम्यान डॉ. कीर्ती पवार यांना मोलाची मदत केली. 

 

Web Title: Pain Relief Expert Dr. Kirti Pawar research was presented in London