Coronavirus : कोरोनाच्या प्रबोधनासाठी पेंटर सरसावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

घराबाहेर न पडण्याचे आवाहन
‘कोरोना - कोई रोड पर ना निकले’ अशा आशयाचे संदेश लिहून त्यांनी कोरोनाचे गांभीर्य दाखविले आहे. स्वत:च्या खिशातले पैसे खर्चून त्यांनी आतापर्यंत वीस लिटर रंग वापरला आहे. रंगांची किंमत प्रति लिटर तीनशे रुपये एवढी आहे. संदेश लिहिताना रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक त्यांचे कौतुक करीत आहेत. मात्र, ‘घराबाहेर पडू नका. नियमांचे पालन करा,’ असे नागरिकांना पेंटरकडून सांगण्यात येत आहे.

पिंपरी - विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांचे सध्या प्रमाण वाढत आहे. सरकारकडून वारंवार सांगूनही काही जण नियमांची पायमल्ली करत आहे. अशा नागरिकांमध्ये गांभीर्य निर्माण होण्यासाठी शहरातील काही पेंटर पुढे आले आहेत. ते चौकाचौकात जाऊन रस्त्यांवर प्रबोधनात्मक संदेश लिहत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोसरीतील दिघी रोड आणि धावडे वस्ती येथील रंगकाम करणारे अमोल सोमवंशी, सिद्धार्थ इंगळे व गजानन बाजड हे सोमवारपासून (ता. ६) प्रबोधनात्मक काम करीत आहेत. दुपारच्या रणरणत्या उन्हात ते नागरिकांसाठी संदेश लिहीत आहेत. आतापर्यंत त्यांनी आळंदी रोड, दिघीतील मॅगझिन चौक, नाशिक फाटा, लांडेवाडीतील शिवाजी चौक, भोसरीमधील पीएमटी चौक, पिंपरी चौक अशा विविध चौकांत त्यांनी संदेश लिहिले आहेत. दोन दिवसांत शहरातील उर्वरित चौकात संदेश लिहून काम पूर्ण करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The painter moved for Coronas enlightenment