निर्मल वारीत घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्तीसाठी जागृती व्हावी - डॉ. कलशेट्टी

यशदाचे उपमहासंचालक डॉ. कलशेट्टी यांची अपेक्षा : निर्मल वारीला सुरू
Palkhi of Saint Tukaram Maharaj and Saint Dnyaneshwar Maharaj Awareness for solid waste management plastic Nirmal Wari  Dr Kalshetti pune
Palkhi of Saint Tukaram Maharaj and Saint Dnyaneshwar Maharaj Awareness for solid waste management plastic Nirmal Wari Dr Kalshetti pune sakal

पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असलेल्या निर्मलवारीच्या माध्यमातून स्वच्छता आणि हागणदारीमुक्त गावांबरोबरच आता घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती करावी, अशी अपेक्षा यशदाचे उपमहासंचालक आणि हागणदारीमुक्त गाव योजनेवर संशोधन करून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केलेले डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी (ता.२४) येथे बोलताना व्यक्त केले. राज्याचा ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वच्छता व ग्रामसभा दिंडी-२०२२' आयोजित करण्यात आली आली आहे. यंदाची ही १७ वी निर्मलवारी आहे. या निर्मल वारीचे उद्घाटन शुक्रवारी डॉ. कलशेट्टी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपायुक्त विजय मुळीक, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, मिलींद टोणपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते. डॉ. कलशेट्टी पुढे म्हणाले, "निर्मलग्राम कार्यक्रमांतर्गत २००५ या वर्षी स्वच्छता दिंडीची सुरुवात झाली. शाश्वत विकास कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टपुर्तीसाठी शासन काम करीत आहे. ग्रामविकास विभागाने आतापर्यंत फिरते (मोबाईल) शौचालय युनिट उपलब्ध करुन दिले आहेत.

गावातील लोकांसाठी शंभर टक्के निर्मलवारी करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आता सर्वांनी मिळून स्वच्छतेबाबत काम करण्याची खरी गरज आहे." दरम्यान, पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये सहभागी होऊन गावा-गावांतील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अंगी स्वच्छता भावना वाढीस लागण्यासाठी प्रतिकात्मक रुपात स्वच्छता दिंडीचे आयोजन केले आहे. सदृढ, आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीसाठी या दिंडीच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवले जाईल, असा विश्वास मनोज लोहिया यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com