पैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार

katraj
katraj

कात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या पाठीमागे समाजाने भक्कमपणे उभं राहावं असे अवाहन नारायणपूरचे सद्गुरू अण्णा महाराज यांनी केले.

राष्ट्रीय अंतराष्ट्रीय पातळीवर यश मिळवण्याची क्षमता महाराष्ट्रातील मल्लांची असूनही केवळ आर्थिक स्थितीमुळे अनेकजणांना कुस्ती सोडून द्यावी लागते. गुणवत्ता असलेले मल्ल कुस्ती क्षेत्रात टिकावेत यासाठी त्यांना सामाजिक बळ देण्याचे उद्देशाने 'महाराष्ट्र राज्य पैलवान फाउंडेशन'ची स्थापना पै. ज्ञानेश्वर मांगडे व त्यांच्या सहकार्यांनी केली होती. औद्योगीक श्रेत्रात यशस्वी कार्य करणार्यांना पुरस्कार, गुणवंत मल्ल आणि वस्तांदाच्या सत्काराने फाऊंडेशनचा प्रथम वर्धापन दिन साजरा झाला. 

यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, चाटे शिक्षण समुहाचे फुलचंद चाटे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, उद्योजक पै.अप्पा खुटवड, पै.पंढरीनाथ पठारे,पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल,एम,पवार, अपोलो हॉस्पिटलचे डॉ. आनंद जाधव, अर्जुनवीर काका पवार, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, कुस्तीचे सुप्रसिध्द समालोचक शंकरअण्णा पुजारी उस्थित होते. 

ऑलिंपिकवीर पै.खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र अभिमान पुरस्कारासह ऑलिंपियन पै. बबनराव डावरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र संघर्ष पुरस्कार बीव्हीजी उद्योग समुहाचे संस्थापक उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना तर रूस्तमे-ए-हिंद पै. हरिश्चंद्र बिराजदार यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार रक्षक परिवाराचे रणजितसिंह पाटील यांना देवून गौरवण्यात आले. ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा राहुल आवारे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांचा सत्कार यानिमित्ताने करण्यात आला. शिवव्याख्याते प्रा.नामदेवराव जाधव यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने कार्यक्राचा प्रारंभ झाला. दिलीप डावरे, सागर बिराजदार यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी दत्ता गायकवाड, मंगलदास बांदल, संदीप भोंडवे, तात्या भिंताडे, बाळाभाऊ धनकवडे, हिंद केसरी अमोल बराटे व शिवछत्रपीती पुरस्कार विजेत कैलास मोहोळ, अशोक शिर्के, सतीश शिंदे, कुलदीप कोंडे असे महाराष्ट्रातील नामांकित मल्ल, उद्योजक फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कुस्तीजन उपस्थित होते.

राजेशाही संपल्यानंतर मल्लांना लाभणारा राजाश्रय संपला असला तरी लोकशाहीत कुस्तीला 'लोकाश्रय' मिळावा या उदात्त हेतूने या फाउंडेशनची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रातील शंभर मल्लांना दत्तक घेण्याचा संकल्प या 
निमित्ताने करण्यात आला आहे. त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण, आवश्यक खुराक, आणि आधुनिक सोई सुविधा देण्यात येणार आहेत. २०२४ आणि २०२८ च्या ऑलंपिक स्पर्धेत या फाउंडेशनचे मल्ल देशासाठी पदक खेचून आणतीलच असा संकल्प पैलवान फाउंडेशनने केला असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांगडे यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com