esakal | घोडेगावमधील पंचायत समितीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर

बोलून बातमी शोधा

Panchayat Samiti in Ghodegaon sanctioned Rs 3 crore
घोडेगावमधील पंचायत समितीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समितीच्या इमारतीच्या फर्निचर, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, इलेक्ट्रीक काम आदीकामांसाठी राज्य शासनाच्या 3 कोटी 5 लाख रुपयांचा निधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली. या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वळसे पाटील यांनीच प्रयत्न करुन 2 जुलै 2014 रोजी 4 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला होता. या इमारतीचे काम 29 डिसेंबर 2018 रोजी पूर्ण झाले. दरम्यान जुनी इमारत गळत असल्याने जून 2019 रोजी नविन इमारतीत तातडीने कामकाज सुरु करण्यात आली. मात्र इमारतीत फर्निचर, रस्ते, इलेक्ट्रीक काम, संरक्षण भिंत आदि कामे झाली नव्हती. कोरोनामुळे गेल्या वर्षी यासाठी निधी उपलब्ध झाला नाही.

हेही वाचा: अखेर नादुरुस्त व्हेंटिलेटर तब्बल 8 महिन्यांनी रुग्णसेवेत

ग्रामविकास विभागाने 30 एप्रिल 2021 रोजी या उर्वरीत कामासाठी 3 कोटी 5 लाख रुपये मंजूर केले आहेत. मंजूर केलेल्या आदेशात हे काम 1 वर्षात पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. खर्चामध्ये वाढ झाल्यास पंचायत समिती अगर जिल्हा परिषदेने करावा असेही सुचविण्यात आले आहे. फर्निचरसाठी 1 कोटी 18 लाख 88 हजार रुपये, इलेक्ट्रीक सिंचनसाठी 20 लाख रुपये, कंपाऊंड वॉल व गेटसाठी 11 लाख 87 हजार रुपये, अंतर्गत रस्तेसाठी 27 लाख 42 हजार रुपये, पार्कींसाठी 7 लाख 95 हजार रुपये तसेच इतर कामासाठी उर्वरित निधी खर्च करण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

याबाबत माजी अध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले, राज्याचे गृहमंत्री यांनी तालुक्यात उल्लेखनिय कामे करण्याचा आपला सपाटा सुरुच ठेवला आहे. जनतेसाठी आवश्यक व महत्वाची कामे करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळातही राज्य शासनाकडून निधी मंजूर करुन घेण्यात वळसे पाटील यांचा प्रयत्न असतो. घोडेगाव येथे सर्वच शासकीय कार्यालये अद्यावत करण्यात येत आहे.

हेही वाचा: अखेर नादुरुस्त व्हेंटिलेटर तब्बल 8 महिन्यांनी रुग्णसेवेत