आंबेगावच्या तरुणांची प्लास्टीकमुक्तीसाठी पंढरपुर सायकलवारी 

सुदाम बिडकर
गुरुवार, 12 जुलै 2018

पारगाव येथुन दि. 8 जुलै ला पहाटे 4 वाजता सायकल रॅलीने पंढरपुरकडे प्रस्थान केले.

पारगाव, (पुणे) - पारगाव ता. आंबेगाव येथील 'अॅबी सायकलिंग ग्रुप' च्या 10 तरुणांनी पारगाव ते पंढरपूर हा 234 किलोमीटर चा प्रवास सायकलवरून करत गावोगावी प्लास्टिक मुक्ती बाबत प्रबोधन केले असल्याची माहीती डॉ. शिवाजी थिटे यांनी दिली.

पारगाव येथुन दि. 8 जुलै ला पहाटे 4 वाजता सायकल रॅलीने पंढरपुरकडे प्रस्थान केले. या रॅलीत डॉ शिवाजी थिटे, डॉ गणेश बढेकर, उद्योजक नाना ढोबळे, उद्योजक प्रमोद हिंगे, शशिकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन देवडे, उद्योजक रामदास मिंडे, अविनाश ढोबळे, प्रदिप चिखले, माजी उपसरपंच शामराव टाव्हरे या दहा जणांचा समावेश होता.

अॅबी ग्रुप ने यापुर्वी  पारगाव ते गोवा रॅली काढून प्रोटीन डिफिसियंसि (शरीरातील प्रोटिन कमतरता) याविषयी प्रबोधन केले होते. अँबी सायकलिंग ग्रुप तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात जाऊन आरोग्य विषयक मार्गदर्शन करून मदत करत आहे असे प्रमोद हिंगे यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Pandharpur cycling for removing plastics from youth of Ambegaon