पंडीत भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा : नितीन गडकरी

Pandit Bhimsen Joshi Cultural Heritage said Nitin Gadkari.jpg
Pandit Bhimsen Joshi Cultural Heritage said Nitin Gadkari.jpg

कोथरुड :''मला लहानपणी पंडितजींचे गाणे ऐकायची दोन-तीनदा संधी मिळाली. त्यांचे शब्द हृदयात जावून पोहचत होते. संतांच्या काव्यावर आधारीत त्यांनी सादर केलेले अभंग आपण कधीही विसरु शकत नाही. पंडीतजींच्या संगीत आराधनेची दखल जगाने घेतली. त्यांचा वारसा आपण जपला पाहिजे''असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाला नितीन गडकरी यांनी सदीच्छा भेट दिली आणि पंडीत जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेतला. त्यावेळी शुभेच्छा देताना गडकरी बोलत होते. यावेळी पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. विजय घाटे, कांचन गडकरी,  गिरीजा बापट, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

काय म्हणावं चोरट्यांना; लोणी-काळभोरमधून डोळे चेक करायच्या मशिन पळवल्या​

गडकरी म्हणाले की, ' भारतीय शास्त्रीय संगीतात फार मोठी शक्ती आहे. ते सर्वांना आवडते, पण त्याचे सादरीकरण, प्रेझेंटेशन आपण चांगल्या रितीने केले पाहिजे.संगीताच्या चांगल्या आराधनेला रसिकांचा प्रतिसाद मिळतो. 'या संगीत यज्ञातून पंडीतजींच्या स्मृती जपून त्यांना आपण अभिवादन केले, ही चांगली गोष्ट आहे. हा 'खयाल यज्ञ 'महोत्सव रसिकांच्या हुदयात कोरला जाईल. महोत्सवात सहभागी कलाकारांचे मी अभिनंदन करतो ',

यावेळी पुनीत बालन यांनी नितीन गडकरी यांचा सत्कार केला. डॉ.विनिता आपटे, राहुल सोलापुरकर यांनी सूत्रसंचालन केले.

German Bakery Blast: 'मी आईवर रागावले, पण आईने तिथून जाण्यास सांगितलं नसतं तर...!'​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com