पंडित नेहरूंचे काम प्रशंसनीय - गोखले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

‘पंडित नेहरूंना काही जणांनी फाळणीचे गुन्हेगार ठरवले असले, तरी फाळणीनंतर नेहरूंनी केलेले काम प्रशंसनीय आहे. ते दंगल झालेल्या ठिकाणी जात आणि दंगलग्रस्तांना त्या परिस्थितीतून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास देत. तेरा वर्षांच्या तुरुंगवासात भारताचा इतिहास व सुरेख इंग्रजीत आत्मचरित्र लिहिले. यातून त्यांचे मोठेपण दिसते,’’ असे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी सांगितले.

पुणे - ‘पंडित नेहरूंना काही जणांनी फाळणीचे गुन्हेगार ठरवले असले, तरी फाळणीनंतर नेहरूंनी केलेले काम प्रशंसनीय आहे. ते दंगल झालेल्या ठिकाणी जात आणि दंगलग्रस्तांना त्या परिस्थितीतून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास देत. तेरा वर्षांच्या तुरुंगवासात भारताचा इतिहास व सुरेख इंग्रजीत आत्मचरित्र लिहिले. यातून त्यांचे मोठेपण दिसते,’’ असे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी सांगितले. 

सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेल्या ‘जवाहरलाल नेहरू’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी गोखले बोलत होते. नव्या पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम झाला. साधना प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी द्वादशीवार यांची या वेळी मुलाखत घेतली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हिंदू समाज धर्मांध नाही, हे महात्मा गांधींनी ओळखले होते.

जातीयता, धर्मांधता, कायद्यापेक्षाही हिंदू हे ‘सचाई’वर दीर्घकाळ प्रेम करतात; हे गांधींच्या लक्षात आले होते. त्यामुळे सहनशक्ती हे हिंदूंचे वैशिष्ट्य ध्यानात घेऊन त्यांनी सत्याग्रहाचा विचार केला.’’

नेहरूंच्या आठवणींचा ठेवा
‘माझी नात आज गणवेशाऐवजी छान रंगीत कपडे घालून शाळेत गेली. तिने सांगितले, की ‘‘आज शाळेत बाल दिन साजरा करणार आहेत,’’ असे सांगून निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले म्हणाले, की आज काहींना नेहरूंचा विसर पडलेला असला, तरी शाळांमध्ये मात्र नेहरूंची आठवण अजून जपली जाते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandit Nehrus work is praiseworthy hemant gokhale