आधी फी भरा मगच निकाल मिळेल...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पुणे : पूर्ण शुल्क न भरल्यामुळे पंडितराव आगाशे शाळेने निकाल देण्यास नकार दिला आहे, अशी तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

पुणे : पूर्ण शुल्क न भरल्यामुळे पंडितराव आगाशे शाळेने निकाल देण्यास नकार दिला आहे, अशी तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

सचिन मदगे असे तक्रार करणाऱ्या पालकांचे नाव आहे. तक्रारीत म्हटले आहे, की माझा मुलगा पंडितराव आगाशे शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आर्थिक परिस्थिती खालावल्याने शुल्क भरण्यास काही दिवसांचा अवधी मिळावा म्हणून शाळेकडे अर्जही केला आहे. व्यवस्थापनाने चर्चेदरम्यान सत्तर टक्के शाळेचे शुल्क भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे तसे शुल्कही भरले. तिसरीचा निकाल आणण्यासाठी पत्नी शाळेत गेली असता, निकाल देण्यास नकार देण्यात आला. दरम्यान, शुल्क न भरल्यामुळे मुलाला दुय्यम दर्जाची वागणूकही देण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.

निकालासाठी अनेकदा शाळेकडे हेलपाटे मारले. परंतु निकाल देण्यास स्पष्टपणे नकार दिला.

पंडितराव आगाशे शाळा ही पूर्णपणे विनाअनुदानित आहे. व्यवस्थापनला इतर खर्चासह शिक्षकांचेही वेतन द्यावे लागते. संबंधित पालकांना त्यांचे पाल्य तिसरीच्या वर्गात पास झाल्याचे कळविण्यात आले आहे.
- मुख्याध्यापिका, पंडितराव आगाशे शाळा.

विद्यार्थ्याचा निकाल अडवून ठेवणे पूर्णपणे चुकीची बाब आहे. कोणत्याही शाळेला शुल्काअभावी निकाल थांबवता येत नाही. बालहक्क शिक्षण कायद्यानुसार हा गुन्हा आहे. शिक्षण संचालकांनी चौकशी करून, शाळेवर कारवाई करावी.
- दिलीपसिंग विश्वकर्मा, अध्यक्ष महापॅरेंट्‌स

Web Title: panditrao aagashes school say First you pay the fee and get the result