तुफान आलया.. पाणी फाउंडेशन..

राजकुमार थोरात
सोमवार, 9 एप्रिल 2018

आज रविवार (ता. 8) पासुन 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेला सुरवात झाली आहे. स्पर्धा 8 एप्रिलपासून 22 मे पर्यंत स्पर्धा सुरु राहणार आहे. इंदापूर तालुक्यातील 37 गावांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे.  

वालचंदनगर - सुर्योदयाची अनेक नागरिक वाट पाहत असतात. मात्र इंदापूर तालुक्यातील पाच गावातील ग्रामस्थ वाट पाहत होती रात्रीचे बारा वाजण्याची. रात्रीचे बारा वाजताच तोफांची सलामी देवून गुढ्या उभारुन नारळ फोडून ग्रामस्थांनी श्रमदानाला सुरवात केली. आज रविवार (ता. 8) पासुन 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेला सुरवात झाली आहे. स्पर्धा 8 एप्रिलपासून 22 मे पर्यंत स्पर्धा सुरु राहणार आहे. इंदापूर तालुक्यातील 37 गावांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे.  

या उपक्रमाअंतर्गत आज (ता. 8) पासुन श्रमदानास सुरवात झाली.
इंदापूर  तालुक्यातील थोरातवाडी, लामजेवाडी, घोरपडवाडी, निरगुडे व उद्घट
गावातील ग्रामस्थ शनिवारी (ता. 7) ला पाट्या, खोरी घेवून रात्रीचे बारा
वाजण्याची वाट पाहत होती. रात्रीचे बारा वाजता या गावातील ग्रामस्थांनी
तोफांची सलामी देवून नारळ फोडून श्रमदानाच्या कामाला सुरवात केली.
घाेरपडवाडी मध्ये तर ग्रामस्थांनी गुढ्या उभारुन श्रमदान सुरु केले.

श्रमदानामध्ये पुरुषांबरोबर महिला ही सहभागी झाल्या होत्या. सुमारे
दोन-तीन श्रमदान करुन दुष्काळमुक्त गाव करण्यासाठी  ग्रामस्थांची धडपड
सुरु आहे. गावातील नागरिकांनी एकोपा केला असून गावामध्ये पावसाळ्यात
वाहून जाणारे जास्तीजास्त पाणी साठविण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरु
आहे. आज सोमवार (ता. 9) रोजी इंदापूर तालूक्यामध्ये श्रमदान सूरू होते. थोरातवाडीमध्ये रात्री दोन तासामध्ये श्रमदानातून ३६ घनफुट काम
करण्यात आले.यामध्ये ३६ हजार लिटर पाणी साठण्यास मदत होणार असल्याचे पाणी फाउंडेशनचे तालुका समन्यवय कृष्णांत शिंदे व बाळासाहेब नगरे यांनी सांगितले.

Web Title: Pani Foundation Water Cup Competition in Valchandnagar