Pankaja Munde: "अजित पवारांचा चांगला प्रचार सुरु"; कसब्यात प्रचाराला आलेल्या पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

पंकजा मुंडे कसबा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरल्या आहेत.
pankaja munde and ajit pawar
pankaja munde and ajit pawarpankaja munde and ajit pawar

पुणे : कसबा पोटनिवडणूकीचा प्रचार सर्वच पक्षांकडून जोरदार सुरु आहे. आज सोमवारी महाविकास आघाडीसह भाजप-शिवेसेनेचा जोरदार प्रचार रॅली पार पडल्या. यावेळी भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी देखील प्रचार केला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या प्रचाराचंही कौतुक केलं. (Pankaja Munde appreciates Ajit Pawar for Kasba By Election campaign)

pankaja munde and ajit pawar
Pankaja Munde: "...काहींना पाहावत नाही"; ठाकरेंच्या फोन प्रकरणावर पंकजा मुंडे अखेर बोलल्या

पंकजा मुंडे म्हणाल्या, अजित पवार यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले आहेत. त्यामुळं आपल्या उमेदवाराचा प्रचार ते चांगल्या प्रकारेच करणार. परंतु आमचा आत्मविश्वास अतिशय दांडगा आहे. परिस्थिती अतिशय सकारात्मक आहे. सरकार आमचं आहे. आपल्याला विकास मिळेल या भावनेतून लोकं देखील आम्हाला निवडून देतील. राज्यातली सत्ता आणि स्थानिक सत्ता जेव्हा एकत्र मिळून काम करतात तेव्हा विकास हा नक्कीच होत असतो.

pankaja munde and ajit pawar
ShivSena Row: शिवसेना भवनही ठाकरेंच्या हातून जाणार का? धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल

दरम्यान, पदवीधर निवडणुकीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, "पदवीधर निवडणुकीतील निकाल नक्कीच निराशाजनक होता. त्यामुळं आता कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच अशी भावना आता कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

मिटकरींच्या शहांवरील टीकेवर भाष्य

अमोल मिटकरी यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्रातले राजकीय नेते दुसऱ्या राज्यात जेव्हा प्रचारासाठी जातात तेव्हा इतरांनी देखील असंच म्हणायचं का? राष्ट्रीय नेता हा कोणत्याही एका राज्याचा नसतो तर तो देशाचा असतो. जेव्हा 370 कलम हटवलं तेव्हा अमित शहा संपूर्ण देशाचे होते. या देशाला स्वतंत्र आणि सुरक्षित सरकार देण्यासाठी पाऊल उचलली तेव्हा अमित शाह देशाचे होते. त्यामुळं त्यांच्याविषयी असं विधान करणं चुकीचं आहे, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com