पानशेत धरण 90 टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

खडकवासला - खडकवासला धरण साखळी क्षेत्रात गुरुवारी चारही धरणांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत पानशेत धरण 90.40 टक्के भरले.

खडकवासला धरणातून बुधवारपासून 428 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत होते. मात्र, गुरुवारी दुपारी चार वाजता विसर्ग बंद केला.

पानशेत धरणातील पाणीसाठा 92 ते 95 टक्के जमा झाल्यानंतर त्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येईल. गुरुवारी पानशेत धरण परिसरात पडणाऱ्या पावसावर या धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन ठरेल, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला होता. तो गुरुवारी कमी झाला. खडकवासला येथे 1, पानशेत येथे 6, वरसगाव येथे 7, तर टेमघर येथे 11 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. वरसगाव धरणात 61 टक्के, तर टेमघर धरणात 63.09 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

खडकवासला धरणसाखळीतील साठा ः गुरुवारची आकडेवारी ः सायंकाळी पाचपर्यंत
धरणाचे नाव - धरणाचा उपयुक्त साठा (टीएमसीमध्ये)/ आजचा साठा (टीएमसीमध्ये)/ टक्केवारी/ आजचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)

खडकवासला - 1.97/ 1.97/ 100/ 1
पानशेत - 10.62/ 9.63/ 9040/ 6
वरसगाव - 12.82/ 7.81/ 60.95/ 7
टेमघर - 3.70/ 2.34/ 63.09/ 11
एकूण - 29.15/ 21.76/ 74.65/ ---
Web Title: panshet dam 90 percent full