पापडेवस्ती-भोसले व्हिलेज चिखलमय रस्त्याच्या दुतर्फा कचराच कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bad road

पापडेवस्ती-भोसले व्हिलेज चिखलमय रस्त्याच्या दुतर्फा कचराच कचरा

उंड्री : पापडेवस्ती-भोसले व्हिलेजकडे जाणाऱ्या चिखलमय रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. पावसामुळे कचरा कुजला असून, दुर्गंधी पसरल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चिखलमय रस्त्यावरून जाताना शाळकरी मुले आणि वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी अजिंक्य ढमाळ आणि गजानन मोहिते यांनी केली आहे.

पापडेवस्ती-भोसलेवस्ती रस्त्यालगत दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. या रस्त्यालगतच लीटल फ्लोवर स्कूल आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिका प्रशासनाने कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करावी आणि कचरा स्वच्छ करून औषध फवारणी करावी. कचरा आणि गवतामुळे सापांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, असे रामदास जाधव, माणिक दळवी, वैभव शेटे, अॅड. अमरसिंग रजपूत, सोहम झाडोकर यांनी सांगितले.

दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वच्छतेविषयी सूचना दिल्या आहेत. रस्त्याची कामे सुरू असून, लवकरच पापडेवस्ती-भोसले व्हिलेज रस्त्याच्या कामाविषयी नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Papadevasti Bhosle Village Muddy Road Garbage Garbage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top