कागदी पिशव्या खाताहेत ‘भाव’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

पुणे - आपल्या हातातील कॅरी बॅगची जागा आता कागदी आणि कापडी पिशव्यांनी घेतली आहे. त्यामुळे कापडी पिशवी पाठोपाठच कागदी पिशव्यांनी आता ‘भाव’ खाल्ला आहे. 

प्लॅस्टिकला पर्याय शोधताना सर्वप्रथम कागदी पिशव्यांना प्राधान्य देण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे त्याची मागणी दिवसेंदिवस सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी दिले. हातांनी तयार केलेल्या कागदी पिशव्यांपासून ते थेट यंत्रांच्या माध्यमातून विणलेल्या पिशव्यांचाही त्यात समावेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शिवाजीनगर येथील हातकागद संस्थेतील लेखा व्यवस्थापक स्वप्नील पाटील म्हणाले, ‘‘प्लॅस्टिक बंदीपूर्वी कागदी पिशव्यांना मोठी मागणी नव्हती. पण, बंदीच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होऊ लागल्यापासून कागदी पिशव्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. शॉपिंग बॅग आणि हातांनी बनवलेल्या बॅगची विक्री २ ते ३ महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते आहे. हातकागद संस्थेत हाताने  बनवणाऱ्या कागदी पिशव्यांची मागणी वाढली आहे.’’ 

बाजारात विविध प्रकारच्या कागदी पिशव्यांचा ट्रेण्ड दिसून येतो आहे. ज्यात बॉक्‍स पेपर पिशवी, किराणा पिशवी, शॉपिंग पिशवी आदी प्रकारच्या पिशव्यांचा समावेश आहे. नागरिक शॉपिंग पिशवी मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत आहेत. प्रामुख्याने नागरिकांचा भर त्यावरच दिसतो आहे, असा अनुभव तुळशीबागेत पिशव्यांचे दुकान असणाऱ्या अजित सुपेकर यांनी सांगितला.

विविध प्रकार उपलब्ध
कागदी पिशव्यांचे अनेक प्रकार
बॉक्‍स पिशवीसह किराणा आणि शॉपिंग पिशवीला पसंती
मागणी वाढल्याने दर वाढताहेत

Web Title: paper bags high price in pune

टॅग्स