पेपरवाले आजोबा म्हणतात,'' पोरांनो, आत्महत्या करू नका''

महेश जगताप 
मंगळवार, 30 जून 2020

''​सकाळी पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत गाजभाऊ आज पंच्याहत्तरीच्या वयातही कार्यरत असतात. तरुणांनी हाजरी आदर्श घेतला तर नक्कीच आत्महत्याचे प्रमाण कमी राहील. 

पुणे : पुण्यात दररोज आत्महत्या होत आहेत हे ऐकलं की मन सुन्न होतं. कोणी आर्थिक कारणातून तर, कोणी वैवाहिक संबंध, वाद-विवाद, करियरच ओझं अश्या अनेक कारणातून पुण्यात आत्महत्येचे सत्र चालू झाल आहे. पण, दुसऱ्या बाजूला आपलं आयुष्य असंख्य कष्टातून, अपार मेहनत करत, असंख्य अडचणी असतानाही आपल्या आयुष्याशी हसतमुख सामोरे जाणारी उदाहरण आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदाशिव पेठेत शनिपार जवळ तुम्ही आला की, हसतमुख चेहऱ्याचे तुम्हाला एक गृहस्थ दिसतील .वर्तमान पत्र व थोडकी फळ विकायला घेऊन बसलेले. त्यांचं नाव आहे गजाभाऊ परदेशी. त्यांना सगळे गाजभाऊ नावानेच ओळखतात. मूळ उत्तरप्रदेश मधील, जन्म मात्र पुण्यामध्ये झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांचं तारुण्य गेलं. त्यामुळे शिक्षणही त्यांना घेता आले नाही. मग काही दिवस भाजीपाला विकणे, फळे विकणे असाही व्यवसाय त्यांनी केला.

HappyBirthday:म्हणून, सुप्रिया सुळे बनल्या संसदरत्न

गेली पंचवीस वर्षे झालीगाजभाऊ  माळवाडी येथून पीएमटीने येऊन दररोज पेपर विकतात. त्याच बरोबर थोडी फळेही ठेवतात आणि आपला उदरनिर्वाह भागवतात त्यांचं आजच वय ७५ च्या पुढे गेले आहे. पण, ते मात्र या वयातही दररोज ते येत असतात. त्यांचा दिवसच संपूर्ण रस्त्यावरच जातो. याही परिस्थितीत ते इतरांना मदत सुद्धा करतात का बरं का ! अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे वर्तमानपत्रे घेण्यासाठी येतात. काही विद्यार्थ्यांकडे पैसे नसल्याकारणाने वर्तमानपत्र घेता येत नाही तर, त्याला आवर्जून सांगतात ''आता घेऊन जा तू अधिकारी झाला ना मला पैसे दे'' अशी उदारता ही त्यांनी जोपासली आहे. एवढ्या खराब परिस्थितीमध्येही त्यांची उदारता मनाला भारावून टाकते.

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

लोक त्यांना विचारतात ''तुम्हाला कामाचा कंटाळा येत नाही काय़  आत्ता वय झालं , आराम करावा, हरिनाम नाव घ्यावं ओठातमग गाजभाऊ त्यांना सांगतात, ''माझं अजून बसून खायचं वय नाही झालं. कामातच आयुष्याचा अर्थ आहे. मलाही अनेक संकटे आली आणि गेली पण, मी कधी खचलो नाही. जेव्हा कोणी आत्महत्या केले हे समजले की वाईट वाटते. आयुष्याला इतक्या लवकर हारायचं नसतं, आपल्या कष्टाच्या जीवावर त्याला हरवायचं., भल्या धीराने जगायच पण, जेंव्हा तरुण पोर सुद्धा आत्महत्या करतात तेव्हा मी ही निराश होतो''

मृण्मयी देशपांडे म्हणते, ताजा भाजीपाला अन् फळे हे फक्त 'सेव्हन मंत्रा...  

''सकाळी पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत गाजभाऊ आज पंच्याहत्तरीच्या वयातही कार्यरत असतात. तरुणांनी हाजरी आदर्श घेतला तर नक्कीच आत्महत्याचे प्रमाण कमी राहील. 
 

....तर गय केली जाणार नाही : दिलीप वळसे पाटील यांचा 'या' खात्याला इशारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paper dealers Gajabhau pardeshi appeal to youth don't commit suicide