पेपर विक्रेत्याच्या गाडीची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

खडकी - खडकी बाजार पोलिस लाइनच्या समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या पेपरविक्रेत्याच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेचे चित्रीकरण तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. त्या आधारावर पोलिसांनी एकाला अटक केली असून, इतर आरोपी फरारी आहेत.

खडकी बाजारपेठेतील टांगास्टॅण्ड चौकात नितीन मनोहर शिंदे यांचा पेपरविक्रीचा स्टॉल आहे. शिंदे त्यांची मोटार पोलिस लाइनच्या बाहेर रस्त्यावर उभी करतात. ८ जानेवारी रोजी रात्री पावणेदोनच्या सुमारास काही समाजकंटकांनी या गाडीची तोडफोड केली. या घटनेचे चित्रण पेपरविक्रेत्यांनी त्याच्या स्टॉलवर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. शिंदे यांनी या घटनेची तक्रार खडकी पोलिसांकडे केली असून, घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दिले आहे. त्याआधारे एकाला अटक केली असून, त्याचे अन्य साथीदार फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वीही खडकीमध्ये चारचाकी आणि दुचाकी तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Web Title: Paper vendor car breaks in khadkee bazar