‘पराग मिल्क’ची उत्पादने दुबई, सिंगापूरला जाणार

मंचर-अवसरी फाटा (ता. आंबेगाव) - पराग मिल्क फूड्‌स कंपनीतील दुग्धजन्य पदार्थांची पाहणी करताना मनामा बहरेण (गल्फ) येथील प्रायव्हेट इक्विटी कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद बिन महाफुद अल्लारादी (उजवीकडून दुसरे), पराग मिल्कचे अध्यक्ष देवेंद्र शहा.
मंचर-अवसरी फाटा (ता. आंबेगाव) - पराग मिल्क फूड्‌स कंपनीतील दुग्धजन्य पदार्थांची पाहणी करताना मनामा बहरेण (गल्फ) येथील प्रायव्हेट इक्विटी कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद बिन महाफुद अल्लारादी (उजवीकडून दुसरे), पराग मिल्कचे अध्यक्ष देवेंद्र शहा.

मंचर - ‘मनामा बहरेण (गल्फ) येथील प्रायव्हेट इक्विटी कंपनी ही जगातील आर्थिक गुंतवणूक करणारी नामवंत कंपनी आहे. या कंपनीमार्फत ‘पराग मिल्क फूड्‌स’मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. पराग मिल्क फूड्‌सची उत्पादने दुबई, सिंगापूर, गल्फ आदी देशांत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,’’ असे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद बिन महाफुद अल्लारादी यांनी सांगितले.

अल्लारादी यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथे ‘पराग मिल्क फूड्‌स’ कंपनीला मंगळवारी (ता. ५) भेट देऊन दुग्धजन्य पदार्थांची, उत्पादनाची व आंतरराष्ट्रीय भाग्यलक्ष्मी डेअरी प्रकल्पाची पाहणी केली, त्या वेळी ते बोलत होते. प्रायव्हेट इक्विटी कंपनीचे मुख्य सहयोगी व्यवस्थापक गिरीश नाडकर्णी, पराग मिल्क फूड्‌सचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कार्यकारी संचालक प्रीतम शहा, संचालिका अक्षाली शहा आदी उपस्थित होते.

देवेंद्र शहा म्हणाले, ‘‘देशात ‘पराग मिल्क’च्या उत्पादनांचे तीन हजार वितरक आहेत, तर ३१ देशांमध्ये ही उत्पादने विक्रीसाठी पाठवली जातात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये दोन हजार ४०० खेड्यांमधील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांकडून दूध घेतले जाते. दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार केले जातात. यापुढे चीजच्या व्यवसायावर अधिक लक्ष देण्याचा विचार आहे. सध्या ‘गो’ चीजचे सर्व उत्पादन मंचरला होते. साठ टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com