तावडे, मंत्री म्हणून तुमचा उपयोग काय?

संतोष शाळीग्राम
शनिवार, 13 मे 2017

स्वतः लक्ष घालणार 
बेकायदा शुल्कवाढीविरोधात दोन वर्षांपासून लढा देतोय; पण सरकारी अधिकारी ऐकत नाहीत, शिक्षणमंत्री वेळ देत नाहीत. नियमांची अंमलबजावणी होत नाही, अधिकारी काहीच करीत नाहीत; मग मंत्री म्हणून तुमचा काय उपयोग? आता आम्हाला आश्‍वासन नको; कारवाई हवी, अशा शब्दांत पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

पुणे - सरकारने नियम तयार केले आहेत. कायदा आहे, त्याची अंमलबजावणी होत नसेल तर आम्ही काय करायचे? शाळांवर अधिकारीदेखील कारवाई करीत नाहीत. त्यांच्यावरही कारवाई होत नाही. मग मंत्री म्हणून तुमचा उपयोग काय,'' अशा शब्दांत एक आईने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना सुनावले. 

फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित एका विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी तावडे पुण्यात आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर पालकांनी त्यांना घेरले. शाळांच्या मनमानी शुल्कवाढी संदर्भात आम्हाला वेळ द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर, "तुम्हाला वेळ देतो; पण केंद्रीय मंत्र्यांना निरोप देऊन येतो,'' असे तावडे यांनी सांगताच आमच्याशी बोला, असे म्हणत पालक आग्रही झाले. ते ऐकत नव्हते, या वेळी शिक्षणमंत्री आणि पालक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. 

पालक संतप्त झाल्याने तावडे यांनी त्यांना फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीकडे नेले. या ठिकाणी प्राजक्ता पेठकर या महिला आक्रमक झाल्या. "मोठी भाषणे करून काहीही होत नाही. मुलाचा प्रश्‍न आहे, तो सोडवा,'' अशी मागणी त्यांनी केली. या पालकांना एका सभागृहात बसविण्यात आले. तेथे शाळांची मनमानी शुल्कवाढ, शाळेतून पुस्तके व साहित्य खरेदी सक्ती आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात केलेली टाळाटाळ हे मुद्दे आक्रमक पद्धतीने मांडले. 

स्वतः लक्ष घालणार 
बेकायदा शुल्कवाढीविरोधात दोन वर्षांपासून लढा देतोय; पण सरकारी अधिकारी ऐकत नाहीत, शिक्षणमंत्री वेळ देत नाहीत. नियमांची अंमलबजावणी होत नाही, अधिकारी काहीच करीत नाहीत; मग मंत्री म्हणून तुमचा काय उपयोग? आता आम्हाला आश्‍वासन नको; कारवाई हवी, अशा शब्दांत पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सर्वच पालकांना पुरेसा वेळ देत त्यांचे म्हणणे विनोद तावडे यांनी ऐकून घेतले आणि सर्व मुद्द्यांमध्ये स्वतः लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: Parents have been burdened by the hike in fees in Pune