खासगी शिकवणीला पालकांचे प्राधान्य

खासगी शिकवणीला पालकांचे प्राधान्य

कोरोनाकाळात आॅनलाइन शिक्षणामुळे निवडला पर्याय; ‘असर’चा अहवाल

पुणे : कोरोनाकाळात शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू होते. म्हणून अनेक पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिकवणीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले. देशात २०२१ मध्ये तब्बल ४० टक्के विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणीचा आधार घेतला. २०१८ च्या तुलनेत या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याची माहिती ‘असर’च्या अहवालातून समोर आली.

प्रथम फाउंडेशनकडून दरवर्षी शालेय स्तरावरील शैक्षणिक स्थितीची देशपातळीवर पाहणी केली जाते आणि त्याआधारे ‘असर’ हा अहवाल प्रकाशित करते. २०२१ या वर्षांचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यातून सद्यस्थितीत ४० टक्के विद्यार्थी सशुल्क खासगी शिकवणी (ट्यूशन) वर्गाला जात असल्याचे उघड झाले. देशात २०१८ मध्ये २८.६ टक्के विद्यार्थी शिकवणीला जात होते. २०२० मध्ये ही आकडेवारी वाढून ३२.५ टक्क्यांपर्यंत पोचली. तर २०२१ मध्ये ३९.२ टक्के विद्यार्थी खासगी शिकवणीला जात असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. देशभरात सर्वच राज्यांमध्ये शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असताना केरळ राज्य मात्र याला अपवाद ठरले आहे. तिथे २०१८ मध्ये २८.२ टक्के विद्यार्थी खासगी शिकवणीला जात होते. हे प्रमाण २०२१ मध्ये १८.८ टक्के इतके म्हणजे ९.४ टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले.

कोरोनाकाळात शाळा बंद होत्या. काही विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण पोचले. तर काही विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचू शकले नाही, हे वास्तव आहे. अशात अनेकांनी खासगी शिकवणीचा आधार घेतला. परंतु चांगले ऑनलाइन शिक्षण, तसेच खासगी शिकवणी आणि त्या तुलनेत कोणत्याही प्रकारे शिक्षण मिळू न शकलेले विद्यार्थी, अशी तफावत प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर दिसून येणार आहे.

- हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com