पिंपरीत आरटीईच्या चौथ्या फेरीची पालकांना प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

शहरात आरटीई प्रवेशासाठी सुमारे 22 हजार ऑनलाइन अर्ज आले होते. तीन फेऱ्यांनंतर सुमारे एक हजार जागा शिल्लक राहिल्या आहेत. मात्र चौथ्या फेरीबाबत शिक्षण विभागाने कोणतीही घोषणा केलेली नाही. परिणामी, रिक्त जागा भरण्यासाठी प्रवेशाची चौथी फेरी राबवून आरटीईच्या सर्व जागा नियमानुसार भराव्यात, अशी मागणी पालकांमधून होत आहे. 

पिंपरी (पुणे) : शहरात आरटीई प्रवेशासाठी सुमारे 22 हजार ऑनलाइन अर्ज आले होते. तीन फेऱ्यांनंतर सुमारे एक हजार जागा शिल्लक राहिल्या आहेत. मात्र चौथ्या फेरीबाबत शिक्षण विभागाने कोणतीही घोषणा केलेली नाही. परिणामी, रिक्त जागा भरण्यासाठी प्रवेशाची चौथी फेरी राबवून आरटीईच्या सर्व जागा नियमानुसार भराव्यात, अशी मागणी पालकांमधून होत आहे. 

आरटीईच्या राखीव जागांवर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे बंधनकारक आहे. काही शाळा प्रवेश देण्याबाबत चालढकलपणा किंवा दुर्लक्ष करत आहेत. आरटीईच्या सर्व जागा भरणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारने लोकहिताच्या नावाखाली प्रत्येक फेरीसाठी एक महिन्याच्या कालावधी घेतला. अनेक पालकांना अर्ज करूनही मोबाईलमध्ये मेसेज आलेच नाहीत. त्यामुळे आपोआपच फेऱ्या लांबत गेल्या. तिसऱ्या फेरीनंतर चौथ्या फेरीविषयी कोणताच ठोस निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला नाही. अनेक पालक अजूनही मेसेजच्या प्रतीक्षेत आहेत. 

सरकार रिक्त जागांचे काय करणार आहे, त्या कोणत्या कोट्यातून भरणार आहेत, याविषयी विभागाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. याबाबत अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. 

आरटीईच्या चौथ्या फेरीसाठी जागा अजूनही शिल्लक आहेत. मात्र प्रवेश प्रक्रिया राबविताना प्रशासनाने खोडसाळपणा केला आहे. अनेक पालक अजूनही प्रवेश मिळेल, या प्रतीक्षेत आहेत. 
- हेमंत मोरे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parents waiting for fourth round of rte in pimpri chinchwad city