leopard calf found
leopard calf foundsakal

Leopard Calf Found : शेतात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळल्याने परिसरात घबराट

शेतात ऊस तोडणी चालू असताना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा दिवसाचे दोन बिबट्याचे बछडे आढळल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
Summary

शेतात ऊस तोडणी चालू असताना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा दिवसाचे दोन बिबट्याचे बछडे आढळल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

पारगाव - अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव येथील खालचाशिवार वस्तीवरील यशवंत नारायण हिंगे यांच्या शेतात ऊस तोडणी चालू असताना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा दिवसाचे दोन बिबट्याचे बछडे आढळल्याने परिसरात घबराट पसरली आहे. या ठिकाणी बिबट्याची मादी असण्याच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून येथील ऊस तोडणी तातडीने थांबवण्यात आली आहे.

येथील यशवंत हिंगे यांच्या शेतात ऊस तोडणी चालू असताना तोडणी कामगारांना बिबट्याचे बछडे आढळल्याने ऊस तोडणी थांबून तात्काळ तिथून बाजूला गेले. हिंगे यांनी गावातील रेस्क्यू सदस्य जयेश शहा यांना भ्रमणध्वनी वरून महिती दिल्यानंतर श्री. शहा यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क साधून तात्काळ वन विभागाचे कर्मचारी व रेस्क्यू सदस्य घटनास्थळी हजर झाले.

वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम, वनमजूर अरुण खंडागळे, रेस्क्यू सदस्य जयेश शहा, मनोज तळेकर, सुनील हिंगे, संतोष हिंगे, बंडू हिंगे, मनोज हिंगे, व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

leopard calf found
Leopard Calf : ताटातूट झालेला बिबट बछडा आईच्या कुशीत

या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून दोन्ही बछड्यांना मादीच्या स्वाधीन करणार असल्याचे स्मिता राजहंस यांनी सांगितले. बछडे आढळल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी उपसरपंच शितल हिंगे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com