‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी साधणार संवाद

पंतप्रधान मोदी दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
Narendra Modi
Narendra ModiSakal
Summary

पंतप्रधान मोदी दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ‘परीक्षा पे चर्चा- २०२२’ (Pariksha Pe Charcha-2022) कार्यक्रमातून देशातील सर्व जवाहर नवोदय विद्यालयांमधील विद्यार्थी, (Students) शिक्षक आणि पालकांशी संवाद (Communication) साधणार आहेत, अशी माहिती नवोदय विद्यालय समितीच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त पी. रविकुमार यांनी दिली.

पंतप्रधान मोदी दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी खेळीमेळीचे आणि आनंददायी वातावरण तयार होते. यावर्षी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअमवर १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे डीडी चॅनेल आणि यूट्यूबवरून ऑनलाइन प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना येणारा ताणतणाव कमी कसा करता येईल, याबाबत मोदी हे आपल्या खास शैलीतून निराकरण करणार आहेत.

नवोदय विद्यालय समितीच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा ही तीन राज्ये आणि दीव दमण केंद्रशासित प्रदेशातील ७३ जिल्ह्यांतील जवाहर नवोदय विद्यालयांचा समावेश होतो. या विद्यालयांमधील सुमारे ३२ हजार विद्यार्थी, ६४ हजार पालक, अडीच हजार प्राध्यापक, प्राचार्य तसेच सुमारे दोन लाखांहून अधिक माजी विद्यार्थी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होणार आहेत, असे समितीचे उपायुक्त पी. रविकुमार यांनी सांगितले. नवोदय विद्यालय समितीचे सहायक आयुक्त बी. वेंकटश्वेरन, अशोक साळी, आर.टी. लाड, मेरी मनी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com