esakal | परिवर्तन देणार ‘आत्महत्या प्रतिबंधक मानसमैत्री’ प्रशिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

sucide

परिवर्तन देणार ‘आत्महत्या प्रतिबंधक मानसमैत्री’ प्रशिक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जागतिक आत्महत्या प्रतिबंधक सप्ताहाच्या निमित्ताने परिवर्तन संस्थेतर्फे पुढील वर्षभर मोफत ‘आत्महत्या प्रतिबंधक मानसमैत्री’ प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अनिस) मानसमैत्री विभागाच्या साहाय्याने तज्ञ समुपदेशकांच्या मार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशी माहिती अनिसचे डॉ. हमीद दाभोलकर आणि परिवर्तन पुणेच्या समन्वयक रेश्‍मा कचरे यांनी दिली आहे.

हेही वाचा: पोलिस जनता दरबारात बारामतीत एकाच दिवशी १२८ अर्जांवर निर्णय

समजतील शिक्षक सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, सामान्य नागरिक, गृहिणी यांनी हे प्रशिक्षण घेतले तर, त्याचा त्यांच्या कुटुंबाला आणि आजूबाजूच्या समाजाला फायदा होऊ शकतो. हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने दोन तासाच्या सत्रात घेतले जाणार आहे. यामध्ये आत्महत्येचा विचार करणारे किंवा मानसिक तणावात असलेल्या व्यक्तींना भावनिक प्रथमोपचार कसे द्यावे याविषयी प्रशिक्षण दिले जाईल.

हेही वाचा: विविध रुपातल्या गणेशमूर्तींना विरोध; पाहा व्हिडिओ

कचरे म्हणाल्या, ‘‘सध्या कोरोनामुळे समाजात ताण तणाव मोठ्या प्रमाणात वाढले असून आत्महत्या देखील वाढताना दिसत आहेत. महाविद्यालयातील युवक- युवती, घरगुती हिंसाचाराच्या बळी असलेल्या महिला, मुले, वृद्ध स्त्री-पुरुष सर्व घटकांमध्ये हे प्रमाण दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजात आत्महत्या प्रतिबंधक प्रशिक्षण झालेले मानसमित्र आणि मैत्रिणी हे खूप महत्त्वाचे ठरू शकतात.’’

हेही वाचा: पुणे : विद्यापीठाची ‘एनआयआरएफ रँकिंग’ घसरली

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे आर्थिक संकट, नोकरी व्यवसाय, स्पर्धा परिक्षा या कारणांमुळे आत्महत्येचे विचार मनात आल्याने फोन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील संख्या अधिक आहे. या सर्वांचे समुपदेशन आणि मनोविकार तज्ञांच्या सहकाऱ्याने मदत करण्यात आली. असे मनोबल हेल्पलाइनच्या समन्वयक रूपाली भोसले यांनी सांगितले.

loading image
go to top