परिवर्तन संस्थेची ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’ शिंदे, झुंजारराव, दाते यांना जाहीर

परिवर्तन संस्थेमार्फत यंदाच्या वर्षीपासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकांच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृती’ देण्यात येणार.
sachin shinde, abhijit jhunjarrao and kshitij date
sachin shinde, abhijit jhunjarrao and kshitij datesakal
Summary

परिवर्तन संस्थेमार्फत यंदाच्या वर्षीपासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकांच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृती’ देण्यात येणार.

पुणे - परिवर्तन संस्थेमार्फत यंदाच्या वर्षीपासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकांच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृती’ देण्यात येणार आहे. या वर्षीच्या शिष्यवृत्तीसाठी सचिन शिंदे, अभिजित झुंजारराव आणि क्षितीश दाते यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘मानसरंग’चे अतुल पेठे, डॉ. हमीद दाभोलकर आणि राजू इनामदार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पेठे म्हणाले, ‘परिवर्तन संस्थेमार्फत गेली पाच वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपचार आणि प्रबोधन करण्यासाठी ‘मानसरंग’ हा मंच चालवला जातो. या मंचाचा एक कार्यक्रम म्हणून ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येत आहे. प्रत्येकी पन्नास हजार रुपये, असे याचे स्वरूप आहे. या शिष्यवृतीसाठी निवडलेले तिन्ही नाटककार या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी भाष्य करणारे नाटक बसवणार आहेत. या नाटकांचे प्रत्येकी किमान दहा प्रयोग त्या-त्या शहरात व्हावेत, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, या तिन्ही नाटकांचा ‘मानसरंग नाट्य महोत्सव’ हा ५ नोव्हेंबरला, मराठी रंगभूमी दिनी पुण्यातील ‘द बॉक्स’ येथे होणार आहे.’’

डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘सध्याच्या कालखंडात मानसिक आरोग्याचा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न म्हणून समोर येत आहे. कोरोनापश्चात त्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अजूनही आपल्या समाजात मानसिक आजारांविषयी पुरेशी माहिती नाही. या प्रश्नांना नाटकाच्या माध्यमातून हाताळण्याचा हा प्रयत्न आहे. ‘बजाज ऑटो’ यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या उपक्रमाला आर्थिक मदत मिळाली आहे.’

नव्या पिढीचे प्रयोगशील दिग्दर्शक

‘शिष्यवृत्ती प्राप्त झालेले तिन्ही कलाकार हे नव्या पिढीचे प्रयोगशील दिग्दर्शक आहेत. यातील सचिन शिंदे हे नाशिक येथे गेली दीड दशके ‘सोशल नेटवर्किंग फोरम’ या नाट्यसंस्थेमार्फत कार्यरत आहेत. त्यांना ‘झी नाट्यगौरव’सह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. अभिजित झुंजारराव हे ‘अभिनय’ संस्थेच्या माध्यमातून मुंबई इथे गेली दोन दशके नाट्यचळवळीत कार्यरत आहेत. ‘लेझीम खेळणारी पोर’, ‘वारकरी’, ‘ब्रेकिंग न्यूज’ अशा अनेक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. तर, क्षितीश दाते ‘थिएट्रोन एन्टरटेनमेन्ट’ या संस्थेमार्फत सिने-नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. ग्रिप्स रंगभूमीवर त्यांनी काम केले असून ‘वाय’, ‘प्राणीमात्र’, ‘बेल’ ही नाटके त्यांनी दिग्दर्शित केली आहेत’’, असे अतुल पेठे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com