महापौरांनी उभारली परिवर्तनाची गुढी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - फाल्गुन वद्य तृतीयेचा मुहूर्त... अर्थातच शिवजयंती. नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक यांनी शनिपार चौकात बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांच्या साक्षीने "परिवर्तनाची गुढी' उभारली आणि जनसेवेच्या कार्यात कटिबद्ध राहण्याचा संकल्प सोडला. तेव्हा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

भाजप युवा मोर्चा आणि कसबा मतदारसंघाच्या वतीने शनिपार चौक येथे चाळीस फूट उंच गुढी उभारण्यात आली होती. या वेळी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक राजेश येनपुरे, भाजपयुमोचे शहराध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे, सरचिटणीस अमित कंक, सागर खरात, उपाध्यक्ष मयूर गांधी, प्रणव गंजीवाले, पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक हेमंत रासने, महेश लडकत, नगरसेविका गायत्री खडके, सुलोचना कोंढरे, स्मिता वस्ते उपस्थित होत्या. 

Web Title: Pariwartan gudhi