नक्षत्र उद्यान होणार लवकरच खुले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

हडपसर - भोसले गार्डन येथे महापालिकेकडून नव्याने विकसित होत असलेल्या "ज्येष्ठ समाजवादी नेते ग. प्र. प्रधान नक्षत्र उद्याना'च्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरचे हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

उद्यानाकरिता "नक्षत्र उद्यान' ही अभिनव संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन उद्यानाची रचना करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नक्षत्रांचे खूप महत्त्व आहे. तसेच भारतीय शेतीही नक्षत्रानुसार केली जाते. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना नक्षत्रांची ओळख व्हावी, या दृष्टीने नक्षत्रानुसार उद्यानातील झाडांची निवड करण्यात आली आहे.

उद्यानासाठी बारा हजार पाचशे चौरस मीटर जागा आरक्षित आहे. त्यातील पाच हजार पाचशे चौरस मीटर जागा ताब्यात आली असून, सध्या या जागेतच उद्यानाचे काम चालू आहे. येथे नागरिकांकरिता रोमन प्रकारचे गझिबो, परगोला बांधण्यात आले आहेत. लहान मुलांकरिता खेळणीपट करण्यात आला असून, ज्येष्ठ नागरिकांकरिता ओपन जिम साहित्य बसविण्यात आले आहे. नक्षत्रानुसार झाडांमध्ये कारंजेही तयार केले असून, या बाजूने कमळाकरिता वेगळी जागा बांधून त्यात कमळे सोडण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडे, रोपे, फुलझाडांबरोबर हिरवळ (लॉन) तयार करण्यात आली आहे. देखण्या प्रवेशाद्वारासह नाल्याच्या कडेने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. झाडे व लॉनसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून, विद्युत व्यवस्थाही करण्यात आली आहे.

नगरसेविका चंचला कोद्रे म्हणाल्या, ""उद्यानाची उर्वरीत जागा ताब्यात आल्यानंतर स्वच्छतागृह, लहान मुलांकरिता अत्याधुनिक पद्धतीचे खेळणीपट, सुरक्षा चौकी, बैठक व्यवस्था, पाणपोई, पार्किंग व्यवस्था इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. उद्यानाच्या कामासाठी आतापर्यंत 2.50 कोटी निधी खर्च करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी साडेतीन कोटी खर्च अपेक्षित आहे. जागा ताब्यात आल्यानंतर उर्वरीत कामे मार्गी लावली जातील.''

Web Title: Park will soon open

टॅग्स