पार्किंगमधील हॉटेल धोकादायक

Hotel
Hotel

पिंपरी - शहरात अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये बेकायदा हॉटेल अथवा कॅन्टिन व्यवसाय सुरू आहे. अनेक हॉटेलमध्ये अग्निरोधक यंत्रणेचाही अभाव आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

काही हॉटेलांमध्ये यापूर्वी आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. मोठी दुर्घटना घडून कोणास इजा झाली नाही. परंतु या घटनांमुळे प्रशासनाने बोध घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार का, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. या हॉटेलमध्ये ग्राहकांना वाहने लावण्यासाठी जागाही नसते. त्यामुळे ती पदपथांवर अथवा रस्त्याच्या कडेला लावण्यात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

मुंबईतील ‘रूफ टॉप’ हॉटेलमध्ये तीन वर्षांपूर्वी आग लागली होती. त्यानंतर महापालिकेने शहरातील ‘रूफ टॉप’ हॉटेलांची पाहणी केली. त्यामध्ये २६ ते २७ हॉटेल धोकादायक आढळली होती. त्यापैकी काही जणांनी न्यायालयात दावे दाखल केले. काहींनी महापालिकेकडे रीतसर परवानगीसाठी अर्ज दाखल केले. काहींनी पहिल्या मजल्यावरील हॉटेल ‘रूफ टॉप’ कसे मुद्दा पालिकेकडे उपस्थित केला.

महापालिकेच्या वतीने पार्किंगमधील हॉटेलांची पाहणी केलेली नाही. काहीजण इमारतीला पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर पार्किंगमध्ये हॉटेल सुरू करतात. यासंदर्भात कोणाची तक्रार आल्यास आणि त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल.  
- मकरंद निकम, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण निर्मूलन विभाग, पालिका

दीड महिन्यापूर्वी राज्य सरकारचा अग्निशमन विभाग, महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आणि हॉटेल व्यावसायिकांची पिंपरीतील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यामध्ये व्यावसायिकांना अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या सूचना दिल्या. आमच्या असोसिएशनच्या सभासदांची पार्किंगमध्ये हॉटेल नाहीत.
- पद्‌मनाभ शेट्टी, अध्यक्ष -पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com