चाकणला वाहनतळ नावाला, एक नाही कामाला

Parking
Parking

आंबेठाण (पुणे) : चाकण औद्योगिक वसाहतीत वाहनतळ अस्तित्वात नसल्याने भर वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने पार्किंग केली जात आहे. खराब आणि अरुंद रस्ते, त्यात दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

वासुली फाटा परिसर, जीई कंपनी चौक, हॅंडसमन कंपनी चौक, एचपी चौक, वराळे येथील महिंद्रा कंपनीसमोर तसेच बहुतांश कंपन्यांच्या पुढे तर कामगारांच्या दुचाकी, चारचाकी गाड्या मुख्य चारपदरी रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. चाकण परिसरात एमआयडीसीचे चार टप्पे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. परंतु, यापैकी सर्वच ठिकाणी बाहेरून येणारी अवजड वाहने, कामगारांची वाहतूक करणाऱ्या कामगारांना कंपनीत सोडल्यानंतर बस आणि अन्य वाहने भर रस्त्यातच उभी केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. काही ठिकाणी तर चारपदरी असणाऱ्या रस्त्यावरून दुचाकी जाणेदेखील मुश्‍कील होत आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून जरी वाहनतळ मंजूर करण्यात आले असले तरी ते प्रत्यक्ष अस्तित्वात नसल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

एमआयडीसी भागातील लहान मोठ्या कंपन्या, गोदामे सुरू आहेत तर काही ठिकाणी नवीन कंपन्या उभारण्यात येत आहेत. बहुतेक कंपन्यांत कच्चा माल घेऊन येणारी वाहने या कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर उभी केली जातात. यापैकी काही वाहनचालकांना तर आत कंपनीत जागा नाही, असे सांगून दोन-तीन दिवस बाहेर ठेवले जाते. त्यामुळे अन्य राज्यांतून आलेले वाहनचालक रस्त्याच्या कडेला वाहने ठेवतात. काही ठिकाणी रस्ता जरी मोठा असला तरी निम्म्या रस्त्यापर्यंत वाहने उभी असल्याने हा रस्ता वाहतुकीस अपुरा ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com