पुणे शहरातील पार्किंग आता महापालिकाच चालविणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

महापालिकेच्या ताब्यातील वाहनतळे आता ठेकेदारांऐवजी महापालिकाच चालविणार असून, त्यासाठी कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानुसार टप्प्याटप्याने 22 वाहनतळे चालविण्याची योजना आखली आहे. ही योजना अमलात आल्यानंतर वाहनचालकांकडून जादा पैसे घेणे, भाडे थकविण्याचे प्रकार थांबण्याची आशा आहे.

पुणे - महापालिकेच्या ताब्यातील वाहनतळे आता ठेकेदारांऐवजी महापालिकाच चालविणार असून, त्यासाठी कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानुसार टप्प्याटप्याने 22 वाहनतळे चालविण्याची योजना आखली आहे. ही योजना अमलात आल्यानंतर वाहनचालकांकडून जादा पैसे घेणे, भाडे थकविण्याचे प्रकार थांबण्याची आशा आहे. 

वाहनचालकांच्या सोयीसाठी विविध भागांत महापालिकेने दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी 22 वाहनतळे सुरू केली आहेत. ती सध्या ठेकेदारांच्या माध्यमातून चालवितात येतात. मात्र, काही ठेकेदार वाहनचालकांकडून नियमांपेक्षा अधिक शुल्क घेत असल्याच्या तक्रारी आहेत. तर ठराविक ठेकेदार महिन्याकाठचे भाडे वेळेत भरत नाहीत. थकबाकी असलेल्या ठेकेदारांवर कारवाई करूनही ती भरली जात नसल्याचे दिसून आले. त्यातूनच महात्मा फुले मंडईतील (कै.) सतीशशेठ मिसाळ वाहनतळावर महापालिकेचे कामगार नेमण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर अन्य वाहनतळेही टप्प्याटप्प्याने ताब्यात घेऊन तिथे कामगार नेमण्याच्या हालचाली महापालिका करीत आहेत. 
वाहनततळांच्या ठेकेदारांची मुदत संपल्यानंतर कामगार नेमण्यात येतील.

त्यासाठी पुरेसे कामगार उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे, असे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parking in Pune city will now be run by the municipality