पहिल्या टप्प्यात पाच रस्त्यांवर पार्किंग धोरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - शहरात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या पार्किंग धोरणाअंतर्गत पाच रस्त्यांची निवड करून अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल उचलण्यात येणार आहे. आठवडाभरात रस्त्यांची निवड केली जाणार आहे. शिवाय विकास आराखड्यातील (डीपी) पार्किंगच्या जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, ज्यामुळे धोरणाचा पहिल्या टप्पा अमलात येण्याची शक्‍यता आहे. 

प्रमुख रस्त्यांवरील नागरिक आणि वाहनांच्या वर्दळीचा अभ्यास करून वाहतूक पोलिस रस्ते निवडणार आहेत. त्यामुळे या धोरणाला गती मिळण्याची शक्‍यता आहे. प्रमुख रस्त्यांची पाहणी करून त्याबाबतची माहिती तातडीने देण्याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी वाहतूक पोलिसांना पत्रही दिले आहे. 

शहरातील वाहनचालकांना पुरेशी पार्किंग व्यवस्था पुरविण्यासाठी महापालिकेने पार्किंग धोरण आखले असून, त्याच्या अंमलबजावणीला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. संपूर्ण शहराऐवजी प्रमुख पाच रस्त्यांवर हे धोरण राबविण्यात येणार आहे. त्याकरिता वाहतूक पोलिस आणि तज्ज्ञांच्या मदतीने रस्त्यांची निवड करण्याचे नियोजन आहे. तथापि, धोरण मंजूर होऊन दीड महिना झाला तरी त्यावर काहीही कार्यवाही झाली नव्हती. धोरणातील तरतुदींना नागरिकांचा विरोध असल्याने त्याची अंमलबजावणी पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी धोरण राबविण्याबाबत पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

""पार्किंग धोरणाबाबत संबंधित घटकांशी वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा करण्यात येत आहे. ज्यामुळे धोरणाच्या अंमलबजावणीला गती येईल. येत्या पाच-सहा दिवसांत रस्ते जाहीर केले जातील,'' असे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. 

पार्किंग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले असून, याबाबतचा अहवाल देण्याची सूचना केली आहे. तो आल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. 
-मुक्ता टिळक, महापौर 

Web Title: Parking strategies on five roads in the first phase