दुतर्फा पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

पिंपरी - आकुर्डी चौकातून दळवीनगरकडे येणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला मोटारी, अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो.

चिंचवडहून आकुर्डीकडे जाणारे अनेकजण दळवीनगरहून आकुर्डी चौकाकडे जातात; तसेच औद्योगिक परिसरातून चिंचवडकडे जाणारे अनेकजण दळवीनगरमार्गे चिंचवडकडे जातात. परंतु या मार्गावर रस्त्याच्या कडेला ट्रक, मोटारी यांसारखी वाहने उभी असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. अशीच परिस्थिती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही असते. तेथे मोटारी लावण्याचे प्रमाण जास्त आहे. 

प्राधिकरणातील शाळा, रुग्णालयाकडे जाणारे या भागातील बरेच विद्यार्थी, नागरिक असतात. या सर्वांना वाहतूक कोंडीचा सामना करावा 
लागतो. आकुर्डीकडून दळवीनगरकडे वळताना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाहनावर आदळून अपघाताचा धोका संभवतो.

मी नेहमी या मार्गाने ये-जा करतो. महापालिकेने येथे सम-विषम पार्किंगचे किंवा ‘नो-पार्किंग’चे फलक लावावेत, त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होईल.
- नितीन साळी, स्थानिक रहिवासी

आमच्याकडे नुकतीच वाहने उचलण्यासाठी क्रेन आली आहे. त्याद्वारे येथे कारवाई मोहीम हाती घेऊ.
- दुर्योधन पवार, पोलिस निरीक्षक, निगडी वाहतूक विभाग

Web Title: parking transport problem