संसदेतील अनुभव अत्यंत वाईट : अनु आगा

anu-aga.jpg
anu-aga.jpg

पुणे : ''मी संसदेत सहा वर्षे खासदार होते. तो काळ माझ्यासाठी सर्वांत वाईट होता. खासदारांना एकमेकांविषयी आदर नसतो, ते फक्त एकमेकांवर आरडा-ओरडा आणि किंचाळत असतात. तिथल्या लोकांना फक्त आपलंच खर करायला आवडतं. तिथून बाहेर पडल्यावर मी खूप सुखी आहे.'' अशी टीका थरमॅक्‍स कंपनीच्या माजी अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री अनु आगा यांनी केली 

जनसेवा फाउंडेशनतर्फे आयोजित "मीट द वर्ल्ड स्टालवर्ट' कार्यक्रमांतर्गत अनु आगा यांची मुलाखत वर्धमान जैन आणि नीरजा आपटे यांनी घेतली. कार्यक्रमाचे उद्‌घाटन खासदार, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. विकफिल्ड ग्रुपचे चेअरमन बहारी बी. आर. मल्होत्रा हे अध्यक्षस्थानी होते. तसेच डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. विनोद शहा, मीना शहा आदी मान्यवर उपस्थित होते. 

संसदेतील कामकाजावर कामावर ताशेरे ओढताना आगा म्हणाल्या, "संसदेत असे लोक का आहेत, असा प्रश्‍न पडतो, खासदारांना पाठवणं तुमच्या हातात आहे. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक खासदार निवडून द्या. तसेच त्यांच्या कामाबद्दल, विकासाबद्दल आणि प्रश्‍न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. खासदार चांगले असतील तर देशाचे भविष्य चांगले असेल. राजकारण आणि प्रशासनातील भ्रष्टाचार थांबायला हवा. महिलांनी स्वतःवर आत्मविश्‍वास ठेवायला हवा. स्वतःकडे लक्ष द्यायला हवे. तरच तुमच्यातला आत्मसन्मान जागा राहतो.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com