पारशी नववर्षाचे उत्साहात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे - घराघरांमध्ये केलेली आकर्षक सजावट...नवीन कपडे...गोड जेवण अन्‌ सकाळपासून सुरू झालेला शुभेच्छांचा वर्षाव अशा चैतन्यमय वातावरणात शुक्रवारी पारशी नागरिकांनी ‘नवरोज मुबारक’ म्हणत एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून पारशी नागरिकांचा फर्वडीन महिना सुरू झाला आहे.

अग्नी आणि झरतुस्त्र देवतेची पूजा, झेंद अवेस्ता ग्रंथाचे वाचन आदी धार्मिक उपक्रमांचेही या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते. 

शहरातील अग्यारींमध्ये दिवसभर दर्शनासाठी पारशी नागरिकांची ये-जा सुरू होती. घरोघरी गोड पदार्थांसह ‘फिश करी साइस’ आणि ‘धनडाल’चा बेत आखण्यात आला होता. अग्यारींमध्ये झरतुस्त्र देवतेच्या प्रतिमेला हार अर्पण करून नागरिकांनी अग्नी देवतेची प्रार्थना केली. कॅम्पमधील सर जे. जे. पीरभाँय अग्यारी, कडमी शहेनशाही अग्यारी, नाना पेठेतील पटेल अग्यारी येथे पारशी धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. 

नागरिकांनी अग्यारीत प्रार्थना केली. तसेच, एकमेकांसमवेत नववर्षाचा आनंद साजरा केला. सकाळपासूनच सोशल नेटवर्किंग साइट्‌सवरूनही नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात येत होत्या. 

Web Title: Parshi new year Celebration