प्रचाराच्या "नाना' वाटा 

सलील उरुणकर 
बुधवार, 4 जानेवारी 2017

""आम्ही खूप काम केले, म्हणूनच आमच्या माणसांना इतर पक्ष आमिष दाखवत आहेत,'' अशा बाता मारणाऱ्या पक्षाला त्या गोष्टी लोकांना पटवून देण्यासाठी "नाना'ची मदत घ्यावी लागत आहे. नाशिकच्या भाषणाची नानाची व्हिडिओ क्‍लिप आणि एका खासगी वृत्तवाहिनीच्या बातमीदाराने केलेल्या कौतुकाची क्‍लिप व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि ट्विटरवरून सध्या "व्हायरल' केली जात आहे. "नाना'च्या पुण्याईच्या जिवावर मते मागण्याच्या वाटेवर निवडणुकीपूर्वी या पक्षाला जावे लागणे हे कशाचे लक्षण आहे, याबाबतची चर्चाही सोशल मीडियावर रंगत आहे. 

धरसोड वृत्ती आणि लोकप्रतिनिधींच्या स्वार्थापोटी अनेक मुद्यांवर उलट-सुलट भूमिका घेतल्यामुळे आधीच तरुणांपासून दुरावलेल्या पक्षाला आता अपेक्षा आहे ती सोशल मीडियावरील "कॅंपेन'वरून लाट निर्माण करण्याची. त्यासाठी "ब्ल्यू प्रिंट'मधील मुद्दे, त्यावर आधारित इन्फोग्राफिक्‍स आणि आता व्हिडिओ क्‍लिप्स पाठविण्यास सुरवात झाली आहे. साहेबांच्या भाषणातील "सुविचार' आणि त्याच्या आजूबाजूला इच्छुक उमेदवाराचा फोटो, पक्षाचे चिन्ह, फेसबुक, ट्‌विटरचे प्रोफाइल, व्हॉट्‌सऍपचा क्रमांक असा तपशील असलेल्या "इमेज'ची निर्मितीही सध्या जोरदार सुरू आहे. लोकांच्या मनातील प्रतिमा सुधारण्यासाठी व्हॉट्‌सऍपवरील अशा प्रतिमा कितपत उपयोगी पडतील, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच!

Web Title: part of the election campaign