पार्थ अजित पवार यांची पहिल्यांदाच मावळात हजेरी

भाऊ म्हाळसकर
सोमवार, 10 डिसेंबर 2018

लोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय बॅटींगची सर्वत्र चर्चा आहे. लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथाॅन स्पर्धेस पार्थ पवार यांच्या हस्ते सुरवात झाली.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कडू, नितिन शहा, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, माजी नगराध्यक्ष अमित गवळी, साहेबराव टकले,राजेश मेहता, कुमार धायगुडे आदी यावेळी उपस्थित होते. 

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात आहे. त्यापार्श्वभुमीवर पार्थ यांची मावळातील हजेरी सर्वांच्याच चर्चेचा विषय झाली आहे. मात्र त्यांनी लोणावळ्यात भाषणबाजी न करता याविषयावर भाष्य करण्यास टाळले. परंतू अजित पवार यांचे चिरंजीव असल्याने त्यांची उपस्थिती तरुण कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक होती. बुधवारी (ता.12) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे पवार साहेबांना शुभेच्छा देणारे जाहीरात फलक जागोजागी लावण्यात आले आहे. त्या फ्लेक्सवर पवार साहेबांबरोबर पार्थ पवार यांची छबी झळकत असल्याने त्यांचा हा राजकीय जीवनाचा श्रीगणेशा तर नाही ना? अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.  

Web Title: Parth Ajit Pawar's first appearance in Mawal