लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदा दिसले पार्थ पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच पार्थ पवार शहरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते.

पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच पार्थ पवार शहरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते.

निकालानंतर पार्थ पवार दिसले नव्हते, त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहातील का, याची चर्चा होती. मात्र, ते उपस्थित राहिल्यामुळे त्यावर पडदा पडला. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांनी जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Partha Pawar's first Public meeting after the defeat of the Lok Sabha elections