सेलिब्रेटींसोबत सहभागी व्हा "फॅमिली वॉकथॉन वुईथ सकाळ' मध्ये!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

जागतिक "मदर्स डे' निमित्त निसर्गरम्य तळजाई टेकडीवर रविवारी (ता. 13) सकाळी साडे सहा वाजता एकत्र येऊन चालूयात ! निमित्त आहे, "फॅमिली वॉकथॉन वुईथ सकाळ' या अनोख्या "मॉर्निंग वॉक' उपक्रमाचे ! यामध्ये अभिनेत्री सुवर्णा काळे, रिना लिमण व मॉडेल अनुजा शिंदे हे सहभागी होणार आहेत. 

पुणे : मुलांना जन्म देताना असह्य वेदनांमध्येही आनंद शोधणारी आई..कधी कुटुंबासाठी धडपडणारी, तर कधी कुटुंबाच्या आनंदासाठी इंचइंच झिजणारी आई. अवघ्या कुटुंबाला एकत्र जोडणाऱ्या, सांभाळणाऱ्या आईच्या दातृत्वाला आणि कष्टाला सलाम करण्यासाठी, तिच्यावरील निस्सीम प्रेमासाठी चला तर मग आपण सहकुटुंब एकदा आपल्या आईसाठी थोडसं चालूयात! जागतिक "मदर्स डे' निमित्त निसर्गरम्य तळजाई टेकडीवर रविवारी (ता. 13) सकाळी साडे सहा वाजता एकत्र येऊन चालूयात ! निमित्त आहे, "फॅमिली वॉकथॉन वुईथ सकाळ' या अनोख्या "मॉर्निंग वॉक' उपक्रमाचे ! यामध्ये अभिनेत्री सुवर्णा काळे, रिना लिमण व मॉडेल अनुजा शिंदे हे सहभागी होणार आहेत. 

anuja shinde

काळ बदलला, तंत्रज्ञान आले. पण एक व्यक्ती, तिचे प्रेम आणि कष्ट मात्र अद्याप बदलले नाहीत, ती व्यक्ती म्हणजे आई ! आपल्या जन्मापासून ते आपला संसार फुलविण्यापर्यंत आई राबत असते. मुलांवरील प्रेमापोटी ती कष्ट झेलत जाते आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत जाते. मात्र, स्पर्धेच्या युगात दिवसेंदिवस वाढणारे ताण-तणाव, मोबाईलमुळे एकत्र असूनही विभक्त वाटणारी कुटुंब, अशा अनेक कारणांमुळे प्रत्येकजण अस्वस्थ आहे. अशा तणावपूर्ण काळातही आपल्या डोक्‍यावर असलेली मायेची सावली कधी ढळत नाही. मातृत्वाची ही सावली आपल्याबरोबर कायम राहावी, या हेतूने "फॅमिली वॉकथॉन वुईथ सकाळ' हा उपक्रम राबविला आहे. 

suvarna

महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. याबरोबरच चित्रपट, सांस्कृतिक, सामाजिक, प्रशासकीय, राजकीय, आर्थिक अशा विविध क्षेत्रांतील सेलिब्रेटी या उपक्रमात आपल्या आई व कुटुंबासह सहभागी होणार आहेत. त्यामुळे आईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक पुणेकरालाही या उपक्रमात आपल्या कुटुंबासह सहभाग घेता येणार आहे. त्यामुळे आई, पत्नी, मुलांसह या "फॅमिली वॉकथॉन वुईथ सकाळ'च्या "मॉर्निंग वॉक' उपक्रमात प्रत्येकाने अवश्‍य सहभाग नोंदवा. केवळ तेवढ्यावरच न थांबता नातेवाईक आणि हो, आपले मित्रमंडळी व अन्य ग्रुपलाही या उपक्रमाशी जोडा. सर्वांनी एकत्र येत तळजाई मंदिर ते ठुबे बंगला मार्गे पुन्हा तळजाई मंदिर येथे मॉर्निंग वॉक करण्यास प्राधान्य द्या. 

Rina

कुठे (मार्ग) - निसर्गरम्य तळजाई टेकडीवरील तळजाई मंदिर-ठुबे बंगला 
कधी - रविवार, 13 मे 
केव्हा - सकाळी साडे सहा 
सहभाग - प्रत्येक पुणेकरांसह विविध क्षेत्रांतील सेलिब्रेटी 

Web Title: participate in family walkathon with sakal with celebraties