निवृत्तीनगरला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांत 210 संघाचा सहभाग 

junnar
junnar

जुन्नर - निवृत्तीनगर ता.जुन्नर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. यात मुला-मुलींच्या एकूण २१० संघांनी सहभाग घेतला.
जिल्हा क्रीडा संघटना, पुणे जिल्हा परिषद, जुन्नर तालुका क्रीडा संघटना व स्व.प्रा.रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्व.प्रा.रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी केली.  

श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले.यावेळी संस्थेचे सर्व सदस्य, सचिव आर.व्ही.जंगले, कारखान्याचे सचिव ए.आर.थोरवे आणि कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी होणेसाठी जुन्नर तालुका क्रिडा संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत, सचिव खराडे, ढमाले व संघटनेचे सदस्य,प्राचार्य मातेले यांचे सहकार्य लाभले.

सत्यशिल शेरकर म्हणाले,प्रो कबड्डी स्पर्धांमुळे खेळाडू कबड्डीकडे आकर्षित होत आहेत. कबड्डीमुळे खेळाडूंचे आरोग्य चांगले रहाते. 

स्पर्धेतील विजयी संघ पुढीलप्रमाणे
१९ वर्षीय मुले - १. रा.प. सबनीस, नारायणगांव २.श्री शिवछत्रपती महाविद्यालय,जुन्नर ३.विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज,साकोरी
शालेय गट १४ वर्षा खालील मुली - १.चैतन्य विद्यालय,ओतूर २.स्व.प्रा. रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडीयम स्कुल,निवृत्तीनगर ३.शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर
१४ वर्षा खालील मुले -१. ज्ञानमंदीर हायस्कुल,आळे
२.आण्णासाहेब आवटे विद्यालय,जुन्नर ३.अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कुल,नारायणगांव
१७ वर्षाखालील मुली -  १.ज्ञानमंदीर हायस्कुल,आळे
२.शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर ३.महालक्ष्मी विद्यालय,उंब्रज.
१७ वर्षाखालील मुले - १. रा.प. सबनिस विद्यामंदीर, नारायणगांव २.ज्ञानमंदीर हायस्कुल,आळे.३.शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर     
स्पर्धेतील सहभागी झालेले खेळाडू,मार्गदर्शक शिक्षक यांना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या वतीने अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था केली होती. पारितोषिक वितरण संस्थेचे सचिव आर.व्ही.जंगले, कारखान्याचे सचिव ए.आर.थोरवे यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना आकर्षक चषक देवून सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com